Monday, March 4, 2024

‘कित्येक वर्षांनी असा योग’ म्हणत प्राजक्ता माळीने दिल्या गुढीपाडव्याच्या दुहेरी शुभेच्छा

आज गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत आहे. मोठ्या उत्साहाने जल्लोषात घरोघरी गुढ्या उभारून नवीन वर्षाची स्वागत केले जात आहे. एकीकडे ढोल ताश्यांचा जल्लोष तर दुरीकडे चविष्ट पदार्थांची रेलचेल. आजच्या दिवसाला हिंदू धर्मात खूपच मोठे महत्व आहे. आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केल्याची मान्यता आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून सगळे जणं एकमेकांना शुभेच्छा देत आहे. कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि टॉपची अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळीने देखील सर्वाना शुभेच्छा देताना आजच्या दिवसाचे महत्व सांगत एका दुर्मिळ योगाची आठवण करून दिली आहे. प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ““चैत्र शुद्ध प्रतिपदा; आजपासून शालिवाहन शके १९४५ शोभन संवत्सरास प्रारंभ होत आहे. तुम्हा सर्वांना मराठी- हिंदू किंबहुना ‘भारतीय’ नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. यंदाचे वर्षी आपलं नव वर्ष आणि भारतीय राष्ट्रीय सौर वर्ष एकाच दिवशी अर्थात आजपासून सुरू होतय. कित्येक वर्षांनी असा योग येतो. त्यामुळे सर्वांना दुहेरी शुभेच्छा,” याला तिने विचारांची गुढी असा हॅशटॅग देखील दिला आहे.

यासोबतच तिने पुढे लिहिले, “हे झालं संस्कृतीविषयी, तेवढाच रस आपल्याला खाद्य संस्कृतीतही आहे. तर यंदाचं नवं वर्ष shooting set वर असताना देखील; श्रीखंड- पुरी, बटाटा भाजी, पापड यावर ताव मारून साजरं करण्यात आलय. माझ्या आयूष्यात “राम” आहे, तुमच्याही आयूष्यात तो भरून राहो.”

या पोस्टसोबत प्राजक्ताने तिचे गुलाबी साडीतील अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. दरम्यान प्राजक्ता सध्या तिच्या ‘प्राजक्तराज’ या दागिन्यांच्या नवीन सुरु केलेल्या ब्रँडमध्ये व्यस्त असून, सोबतच ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अविनाश- विश्वजित यांचा हॉलिवूडमध्ये धुमाकूळ! ‘या’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केले एक अधुनिक वेडिंग साँग

‘सीता रामम’ फेम मृणाल ठाकूरने गुढी पाडवाच्या शुभेच्छा देत शेअर केले फाेटाे, एकादा पाहाच

हे देखील वाचा