Saturday, January 17, 2026
Home कॅलेंडर फिटनेस फ्रिक प्राजक्ता माळीचे शिवनेरीच्या पायथ्याशी सूर्यनमस्कार, पाहा व्हिडीओ

फिटनेस फ्रिक प्राजक्ता माळीचे शिवनेरीच्या पायथ्याशी सूर्यनमस्कार, पाहा व्हिडीओ

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी सूर्यनमस्कार घालतानाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओला तिच्या फॅन्सने भरभरून लाईक्स दिले आहेत.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल टाकणाऱ्या प्राजक्ताने खूप कमी वेळात आपले स्थान निर्माण केले. प्राजक्ता नेहमीच तिच्या फॅन्स सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असते. तिच्या नवनवीन ऍक्टिव्हिटीचे व्हिडिओ, फोटो सर्व ती तिच्या अकाउंटवर पोस्ट करते. नुकताच प्राजक्ताने तिचा सूर्यनमस्कार करतानाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करतांना तिने लिहले की, “शिवनेरी किल्ल्याचा पायथा, ७५ वर्ष जुनी शाळा, खूप ऑक्सीजन, भरपूर सूर्यप्रकाश, आणि माझे प्रिय सूर्यनमस्कार.., #आनंदी आनंद , वेळ सकाळी ८, शूटिंगचे स्थळ असावं तर असं”

प्राजक्ता माळी शिवनेरी किल्याजवळ शूटिगच्या निमित्ताने गेली आहे. सेटजवळच्या एका ७५ वर्ष जुन्या शाळेत प्राजक्त सकाळी सकाळी सूर्यनमस्कार घालत आहे. सकाळी सकाळी शहरापासून दूर स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणाचा प्राजक्ताने पुरेपूर उपयोग करून घेत सूर्यनमस्कार घातले. तिच्या या व्हिडिओला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येत आहे. आता प्राजक्ता नक्की कोणती शूटिंग करते, तिच्या सोबत अजून कोणकोण कलाकार आहेत आदी गोष्टींबद्दल तिने कोणताच खुलासा केला नाहीये.

फिटनेस फ्रिक असलेली प्राजक्ता तिच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक असते. ती नेहमीच तिच्या व्यायामाचे व्हिडिओ, आरोग्यासंबंधीच्या टिप्सचे व्हिडिओ तिच्या अकांऊट वरून पोस्ट करत असते. लॉकडाउनच्या काळात तर तिने अनेक व्हिडिओ पोस्ट केले. सर्व लोकं घरातच असल्यामुळे सर्वाना भरपूर वेळ आहे. त्यामुळे सर्वानी व्यायाम करा आणि स्वतःला फिट ठेवा असे सांगत योगाचे अनेक प्रकार असलेले व्हिडिओ पोस्ट केले होते.

प्राणायामचे प्रकार, घरच्या घरी फिट राहण्याच्या टिप्स, योगाचे प्रकार, अष्टांगयोगा सूर्यनमस्कार, असे अनेक व्हिडिओ तिने पोस्ट केले होते.

प्राजक्ताच्या कामाबद्दल सांगायचे तर ती शेवटची ‘डोक्याला शॉट’ या सिनेमात दिसली होती. सध्या ती सोनी मराठीच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

 

हे देखील वाचा