Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिमानास्पद! प्राजक्ता कोळीच्या डॉक्युमेंट्रीला मिळाला ‘डेटाइम एमी अवॉर्ड’, मिशेल ओबामांचे मानले आभार

देशातील लोकप्रिय यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी सध्या यशाचे शिखर चढत आहे. तिची डॉक्युमेंट्री ‘क्रिएटर्स फॉर चेंज’ला ‘डेटाइम एमी अवॉर्ड’ने सन्मानित केले आहे. प्राजक्ता देखील अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या डॉक्युमेंट्रीचा एक भाग आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये ती मिशेल ओबामा, लिसा कोशी आणि थेम्बे महलाबा यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. अवॉर्ड मिळाल्यामुळे प्राजक्ता खूप खुश आहे. प्राजक्ता म्हणते की, तिला जागतिक व्यासपीठावर तिचे मत मांडण्याची संधी मिळाली, यासाठी ती मिशेल ओबामा यांची आभारी आहे. (Prajkata koli win daytime Emmy awards for her documentry)

वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, “मला यावर विश्वास ठेवायला थोडा वेळ लागेल. परंतु उठल्यावर हे ऐकून खूप खुश आणि आभारी आहे की, आमच्या ‘क्रिएटर्स फॉर चेंज डॉक्युमेंट्री’ने डेटाइम एमी हा अवॉर्ड जिंकला आहे. माझ्यासारख्या क्रिएटरला नेहमी माझे मत मांडण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल यूट्यूबला खूप सारे प्रेम.”

प्राजक्ताने पुढे सांगितले की, “मी मिशेल ओबामा जी यांची खूप आभारी आहे. ज्यांनी मला एवढ्या चांगल्या प्रोजेक्टचा भाग होण्याची संधी दिली. यासोबत मी लिसा आणि थेम्बे यांच्यावर देखील खूप प्रेम व्यक्त करत आहे. वाह काय अनुभव आहे!!!”

डेटाइम एमी अवॉर्डमध्ये डॉक्युमेंट्री ‘क्रिएटर्स फॉर चेंज’ने नॉन फिक्शन स्पेशल अवॉर्ड जिंकला आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये व्हिएतनाम, भारत आणि नामीबियामधील तरुण मुलींचा अनुभव दाखवला आहे. ज्या त्यांचे शिक्षण घेण्यासाठी अनेक कठीण परिस्थितीचा सामना करतात.

प्राजक्ता कोळीने यावर्षी नेटफ्लिक्सवर ‘मिसमॅच’मधून डेब्यू केला आहे. या चित्रपटात तिने रोहित सराफसोबत काम केले आहे. तसेच ती ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात नीतू कपूर, अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा आडवाणी असणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्का शर्माचा कौतुकास्पद निर्णय; ‘या’ कारणामुळे ऑनलाईन विकणार प्रेग्नंसीमधील कपडे

-अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या शिरपेचात मानाचा तुरा, राज्यपालांच्या हस्ते ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कारा’ने केले सन्मानित

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

हे देखील वाचा