मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkta Mali) नेहमीच चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून तिच्या फुलवंती या चित्रपटासाठी ती चर्चेत होती. परंतु यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचे एका वेगळ्या विषयावरून नाव घेतले होते. आणि यावरूनच प्राजक्ताने महिला आयोगात देखील त्यांची तक्रार नोंदवली होती. तिने पत्रकार परिषदे घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी असे सांगितले होते. यानंतर तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. आता या सगळ्या प्रकारानंतर सुरेश धस यांनी व्हिडिओ शेअर करून जाहीरपणे प्राजक्ता माळीची माफी मागितलेली आहे. सुरेश धस यांनी माफी मागितल्यानंतर प्राजक्ताने देखील त्यांचे आभार मानलेले आहेत. आणि हा विषय तिच्याकडून इथेच संपला असे देखील दिले जाहीर केलेले आहेत.
या व्हिडिओमध्ये प्राजक्ता म्हणाली की, “तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम आभार मानते. पत्रकार परिषद घेतल्यापासून मी आणि माझे कुटुंब शेकडो मेसेज, फोन कॉल, सोशल मीडिया टॅग यांना सामोरे गेलो आहोत. महिलांच्या सन्मानासाठी समाजातील सर्व स्तरातून आवाज उठवला गेला. पाठिंबा देखील दिला गेला. त्याचे समर्थन यामुळे आम्हाला पण मिळाले. यासाठी खूप सारे धन्यवाद. त्याचबरोबर माननीय आमदार सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते. त्यांनी अत्यंत मोठ्या मनाने समस्त महिला वर्गांची माफी मागितली आहे. दिलगिरी व्यक्त केली आहे. दादा खूप धन्यवाद. असे करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहात. तुम्ही छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठीण होती, हे आपण सगळे जाणतो. ही छत्रपतींची भूमी आहे. त्यांचे विचार पुढे चालवले जातील, हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलेले आहे.”
यानंतर प्राजक्ता माळी पुढे म्हणाली की, “आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे मी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करणार नाही करू इच्छित नाही. आज या प्रकरणावर माझ्याकडून पडदा टाकते.” अशा प्रकारचे वक्तव्य तिने केले आहे. सुरेश धस आणि तिच्यामधील हा मुद्दा इथेच संपवलेला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पिवळी साडी आणि डायमंड ज्वेलरी; अमृता खानविलकरचे फोटो सर्वत्र व्हायरल
अमित त्रिवेदीने चोरी केले होते लुटेराचे गाणे ? या गाण्याची थीम कॉपी केल्याचा लागला होता आरोप…