Friday, July 5, 2024

प्राजक्ता माळीने भोंग्यावरुन ईदच्या दिवशीच दिला ‘हा’ इशारा, व्हायरल होताच तात्काळ इडीट केली पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भोंगा आणि अजानवरुन चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या जाहीर सभेत मशिदीवरी भोंगे उतरवण्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन सरकार आणि विरोधी पक्षांच्यात चांगलेच राजकारण तापले होते. या वादात आता मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajkta Mali) उडी घेतली आहे. प्राजक्ताने रमजान ईदच्या शुभेच्छा देतानाच मशिदीवरील भोंग्यावरुनही थेट इशारा दिला होता. मात्र ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने तात्काळ पोस्टचा कॅप्शन बदलला. या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

मराठी सिने जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच प्राजक्ता सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असते. विविध विषयांवर ती आपले स्पष्ट मत देत असते. सध्या प्राजक्ताची नुकतीच शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने भोंग्याच्या वादावरुन मत व्यक्त केले आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन प्राजक्ताने अक्षय तृतीयाच्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ज्यामध्ये तिने रमजान ईद आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचबरोबर तिने “आज ३ तारीख, यानंतर तरी भोग्यांचे आवाज बंद होतील” अशी आशा बाळगते असा कॅप्शन दिला होता.

सोबतच तिने राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेखही केला होता. ज्यामध्ये तिने धन्यवाद राज ठाकरे साहेब म्हणत कौतुक केले होते.  मात्र पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या ज्यामुळे तिने हा कॅप्शन इडीट करत फक्त आज ३ तारीख असा सुचक संदेश दिला आहे. सध्या तिच्या या इडिट केलेल्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा