Friday, April 19, 2024

राजबिंडा अभिनेता अजिंक्य देव वाढदिवस, असा आहे मराठी सिनेजगातील पहिल्या हॅण्डसम हिरोचा यशस्वी प्रवास

मराठी सिनेजगतात अजिंक्य देवच्या (Ajinkya Dev)  अभिनयाचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. मराठी सिने जगतातील देखणा आणि हॅण्डसम हिरो अशी त्याची खास ओळख, अगदी ९० च्या दशकापासून आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने अनेक गाजलेल्या चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठी सिने जगतात अगदी घराघरात त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सहजसुंदर अभिनय आणि राजबिंड व्यक्तिमत्व असलेल्या अजिंक्य देवने मराठी सिने जगतात, हिंदी तसेच तामिळ चित्रपटातही काम केले आहे. मंगळवार (३ मे) अजिंक्य देवचा वाढदिवस पाहूया या कलाकाराचा सिने जगतातील यशस्वी प्रवास. 

मराठी सिने जगतात पहिले देखणे हिरो म्हणून रमेश देव यांचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. आपल्या अभिनय कारकिर्दित त्यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. रमेश देव आज आपल्यात नसले तरी मराठी सिनेसृष्टीला दिलेले त्यांचे योगदान कोणीच विसरणार नाही. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत चिरंजीव अजिंक्य देवनेही मराठी सिने जगतात आपल्या अभिनयानेन सर्वांनाच मोहित केले आहे. अभिनेता अजिंक्य देवचा जन्म ३ मे १९९३ ला मुंबईमध्ये झाला. घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या अजिंक्यला पहिल्यापासूनच सिनेमा जगतात काम करण्याची इच्छा होती.

अभिनेता अजिंक्य देवने १९८५ साली आलेल्या ‘अर्धांगी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली. पहिल्याच चित्रपटातील अजिंक्यच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. ८० ते ९० च्या दशकात मराठी सिने जगतातील सर्वात राजबिंडा अभिनेता अशी त्याची खास ओळख होती. अजिंक्य देवने ‘वहिनीची माया’, ‘माझे घर माझा संसार’, ‘शाब्बास सुनबाई’, ‘सर्जा’, अशा अनेक कौटुंबिक चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये आपल्या अभिनयाने त्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. मराठी सिने जगतातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपट म्हणजेच माहेरची साडीमध्ये त्याने केलेल्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या भूमिकेने अजिंक्य देवला घराघरात पोहोचवले.

अजिंक्यने फक्त मराठीच नव्हेतर ‘सोने पे सुहागा’ सारख्या अनेक हिंदी आणि तामिळ चित्रपटातही काम केले. कोणत्याही भूमिकेसाठी जिवतोड मेहनत घेऊन त्यात जिवंतपणा आणणे ही अजिंक्यच्या अभिनयाची खासियत होती. ‘सरकारनामा’, ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’, ‘रिंगा रिंगा’, ‘जेता’ अशा चित्रपटांमधील त्यांच्या  भूमिका आजही प्रेक्षकांना मोहित करत असतात. चित्रपट जगतात आपली चॉकलेट बॉयची प्रतिमा तयार करणाऱ्या अजिंक्य देवची लवस्टोरीही खूपच भन्नाट आहे.

अजिंक्य देवची पत्नी आरतीही त्या्च्याच वर्गात शिकत होती. पार्ले कॉलेजमध्ये बीएससीच्या पहिल्या वर्गात शिकत असताना दोघांची मैत्री झाली आणि याच तो आरतीच्या प्रेमात पडला. मात्र आरती कडून मात्र असा काहीच विचार नव्हता. त्यामुळेच त्याने आरतीला थेट प्रपोज करायचे ठरवले.  अजिंक्य देवने आरतीला केलेला सिनेमा स्टाईल प्रपोजची स्टोरीसुद्धा तितकीच  भन्नाट आहे. अजिंक्यने आरतीला जुहू बीचवर गाडी आडवी मारत सिनेमास्टाईल प्रपोज केले. मात्र यामुळे आरती रडायलाच लागली. काही दिवस गेल्यानंतर आरतीनेही अजिंक्यच्या प्रेमाचा स्विकार केला. त्यानंतर त्यांच्या या लवस्टोरीचा डिसेंबर १९८६ ला लग्नाचा बार उडवून गोड शेवट झाला. अजिंक्य देव आणि आरतीला आर्य आणि तनाया अशी दोन मुले आहेत. अजिंक्य आणि आरती यांनी ‘स्पेशल चाइल्ड’साठी एक शाळा सुरु केली आहे. या माध्यमातून ‘स्पेशल चाइल्ड’ असलेल्या मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी ते प्रयत्न करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा