Wednesday, April 30, 2025
Home मराठी ‘असं वाटतंय आता पळून यावं महाराष्ट्रात’, प्राजक्ता नेमकी कुठे अडकलीये?

‘असं वाटतंय आता पळून यावं महाराष्ट्रात’, प्राजक्ता नेमकी कुठे अडकलीये?

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkta Mali) सध्या तिच्या रानबाजार या वेबसिरीजमुळे सर्वत्र चर्चेत आली आहे. सिरीजच्या नावापासून ते यामधील प्राजक्ताच्या बोल्डलूक पर्यंत नेहमीच ही सिरीज चर्चेत आली होती. यामधील प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितच्या बोल्डलूकची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. सध्या ही वेबसिरीज चांगलीच लोकप्रिय ठरत असून यामधील प्राजक्ता माळीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तत्पुर्वी सध्या ट्रिपवर गेलेल्या प्राजक्ताची एक सोशल मीडिया पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने दिलेल्या पळून यावंस वाटतंय या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.नक्की काय आहे या पोस्टमागची खरी कथा चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्राजक्ता सध्या तिच्या रानबाजार या वेबसिरीजमुळे सर्वत्र चर्चेत आली आहे. त्याचबरोबर ती हास्यजत्रा या कार्यक्रमातही झळकत आहे. या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत ती सध्या तिच्या सोलो ट्रीप इनजॉय करताना दिसत आहे. पण त्याचबरोबर ती आपल्या मायभूमीलाही खूप मिस करत आहे ज्याचा उल्लेख तिने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

सध्या प्राजक्ता हिमाचल प्रदेशमधील पर्वतरांगांमध्ये सुट्टीची मजा  घेताना दिसत आहे. ज्याचे फोटो प्राजक्ताने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोंसोबत प्राजक्ताने दिलेले कॅप्शन सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या कॅप्शनध्ये प्राजक्ताने “कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीक जास्त ५-६ दिवस आनंद घेऊ शकते नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण यायला लागते, हो आत्ता पळून यावं; इतकी आठवण येतेय,” असे म्हणत सुट्टीची मजा संपल्याचे सांगितले आहे. सध्या प्राजक्ताचा हा फोटो आणि कॅप्शन चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा