Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड ‘मानवतेचा उत्सव साजरा करूया’ म्हणत, प्रकाश राज यांनी ध्वजारोहण करत साजरा केला अमृतमहोत्सव स्वातंत्रदिन

‘मानवतेचा उत्सव साजरा करूया’ म्हणत, प्रकाश राज यांनी ध्वजारोहण करत साजरा केला अमृतमहोत्सव स्वातंत्रदिन

आज आपला देश त्याचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यावर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. ७५ वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालेल्या देशाने मोकळा श्वास घेतला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ संपन्न झाले. कलाकारांनी देखील ध्वजारोहण करत देशाप्रती त्यांचे प्रेम व्यक्त केले.

साऊथ आणि बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते, प्रकाश राज यांनी देखील आज ध्वजारोहण केले आहे. त्यांनी या ध्वजारोहणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, सोबत एक संदेशही लिहिला आहे. प्रकाश राज यांनी चार फोटो शेअर केले असून, दोन फोटोंमध्ये ते ध्वजारोहण करताना दिसत असून, एका फोटोमध्ये ते लहान मुलांना तिरंगा देताना दिसत आहे. तर एका फोटोत ते केक कापून स्वतंत्रदिनाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. (prakash raj celebreted Independence day)

प्रकाश राज यांनी त्यांच्या या फोटोंसोबत लिहिले, “ज्यांच्यामुळे आपल्याला स्वतंत्र मिळाले त्या सर्वांना सलाम, जे हे स्वातंत्र टिकावे म्हणून झटत आहे त्यांना सलाम, आपण एक आहोत, आपण सर्व समान आहोत, हा मानवतेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येऊया. भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.” अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दात त्यांनी स्वातंत्र्याचे खरे शिलेदार असणाऱ्यांना त्यांचा संदेश अर्पण केला आहे.

प्रकाश राज यांचा काही दिवसांपूर्वी छोटा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर हैद्राबाद येथे त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. प्रकाश राज यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये आपण पाहिले तर त्यांचा हात बेल्टमध्ये असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाश राज यांनी त्यांच्या अपघातबाबत आणि त्यांच्या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली होती. त्यांच्या ऑपरेशननंतर देखील त्यांनी सर्जरी यशस्वी झाल्याची पोस्ट शेअर केली होती.

बहुतकरून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सक्रिय असणाऱ्या प्रकाश राज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी सिंघम, गोलमाल अगेन, हिरोपंती, दबंग, खाकी, भाग मिल्खा भाग, एंटरटेनमेंट आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिन विशेष!! जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

हे देखील वाचा