प्रत्येक दिवशी भोजपुरी भाषेमधील गाणे यूट्यूबवर प्रदर्शित केले जातात. भोजपुरीमध्ये अनेक गायक, कलाकार असे आहेत, ज्यांच्या गाण्यांसाठी त्यांचे फॅन्स अगदी आतुरतेने वाट बघतात. हटके शब्द, उडत्या चालींमुळे ही गाणी प्रेक्षकांच्या अगदी सहज तोंडावर रुळतात. आपण विचारही करत नसू अशा शब्दांचा वापर भोजपुरी गाण्यांमध्ये केला जातो. कदाचित याच कारणामुळे ही गाणी प्रेक्षकांशी लवकर जोडली जात असतील. या इंडस्ट्रीमधील अनेक लोकप्रिय आणि सुपरस्टार गायकांपैकी एक असणारा गायक म्हणजे प्रमोद प्रेमी यादव. नुकतेच याचे एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.
एसआरके म्युझिक या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रमोद यादव आणि शिल्पी राज यांचे ‘साडी ग्रीन चाही’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून या गाण्याला फॅन्स आणि प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून, त्याचे हे गाणे एक कांवड गीत आहे. श्रावण येण्याआधी सर्वच भोजपुरी गायक शंकरच्या भक्तीमध्ये लीन होतात आणि त्यांचे कांवड गीत प्रदर्शित करतात. हे कावड गीते सर्वच प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या गाण्याला एकाच दिवसात ६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
शिल्पी राज आणि प्रमोद प्रेमी यादव या दोघांनी या गाण्यात धमाल केली आहे. या गाण्यात प्रमोद प्रेमी यादवसोबत भोजपुरीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मणी भट्टाचार्य दिसत आहे. या गाण्यात मणी अतिशय सुंदर दिसत आहे. कृष्णा बेदर्दी यांनी हे गाणे लिहिले असून, या गाण्याला आर्या शर्मा यांनी संगीत दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रमोद प्रेमी यादवचे ‘पिया जी के लुन्गी’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात प्रमोद प्रेमी यादव अतिशय रोमँटिक अंदाजामध्ये दिसत आहे. या गाण्यातला त्याचा अंदाज आणि डान्स फॅन्समध्ये चांगलाच गाजत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










