मराठी टेलिव्हिजनवरील अनेक मालिका सध्या ट्रेंडिंग आहेत. यातील झी मराठीवरील एक मालिका जोरदार चर्चेत आहे. ती मालिका म्हणजे ‘तुझी माझी रेशीमगाठ’ होय. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील कलाकार देखील चांगलेच चर्चेत आहेत. यामध्ये प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी यांखेसार कलाकार दिसत आहे. यासोबत या मालिकेत असणारी चिमुकली अभिनेत्री या मालिकेचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. ती म्हणजे मायरा वैकुळ होय. मायराचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तसेच मालिकेतील मायरा आणि प्रार्थनाची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना भावत आहे. अशातच प्रार्थना आणि मायराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
प्रार्थनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि मायराचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मायरा कोळी वेशात दिसत आहे. तिने खूप सुंदर ड्रेस घातला आहे. तसेच प्रार्थनाने आकाशी रंगाचा ड्रेस घातला आहे. त्या दोघींचा हा लूक ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील आहे. त्या दोघीही ‘मी हाय कोली’ या गाण्यावर डान्स करत आहेत. त्या दोघी ही या व्हिडिओमध्ये खूप गोड दिसत आहेत. तसेच छोट्या मायराचे हावभाव बघण्यासारखे आहेत. (Prarthana behere and myra vaikul’s dance video viral on social media)
या व्हिडिओमधील मायराचा डान्स खूपच सुंदर आहे. मायरा ही खूप लोकप्रिय आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत येण्याआधीच तिची खूप जास्त फॅन फॉलोविंग आहे. मायराचे सोशल मीडियावर २ लाखांपेक्षाही जास्त फॉलोव्हर्स आहेत. तिच्या या व्हिडिओवर देखील अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
प्रार्थना बेहेरेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेत तिने अंकिता लोखंडेच्या छोट्या बहिणीचे पात्र निभावले होते. या पात्राने ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर तिच्या करिअरला असे काही वळण मिळाले की, केवळ ‘मितवा’ या एका चित्रपटाने तिला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. ‘मितवा’ या चित्रपटासाठी प्रार्थना नाईन ‘एक्स झकास हिरोइन’ या शोची विजेती स्पर्धक झाली होती.
यानंतर तिने ‘व्हाट्सअप लग्न’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर एँड मिसेस सदाचारी’, ‘ती आणि ती’, ‘मस्का’, ‘लव यू जिंदगी’, ‘फुगे’ या चित्रपटात काम केले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘…सांग मग कधी येऊ बोलणी करायला?’ प्राजक्ता माळीचा व्हिडिओ पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी
-‘बिग बॉस ओटीटी’चा किताब जिंकून घरी परतली दिव्या; बॉयफ्रेंड वरुणने खास अंदाजात केले स्वागत
-राखी सावंतला पती रितेशचा पाठिंबा, राघव चड्ढांच्या ‘या’ विधानावर घेतली त्यांची शाळा