मराठी सिनेजगतातील अनेक अभिनेत्री त्यांच्या चित्रपटातील अभिनयासह सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चा होत असते. यामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या अभिनयाने मराठी सिने जगतात प्रार्थना बेहरेने (Prarthana Behere) स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे आणि चित्रपटांचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सध्या प्रार्थनाने शेअर केलेल्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्यामधील तिच्या सोज्वळ सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केले आहे.
प्रार्थना बेहरे ही मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रत्येक चित्रपटात आपल्या भूमिकेचा ठसा उमटवला आहे. त्यामुळेच प्रार्थनाच्या नावाची मराठी सिने जगतात नेहमीच चर्चाव होताना दिसत असते. आपल्या अभिनयाप्रमाणेच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. ज्यावरुन ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या फोटोंवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत असतात. सध्या प्रार्थनाच्या अशाच एका व्हायरल व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये तिच्या घायाळ अदांनी सर्वांनाच प्रेमात पाडले आहे.
प्रार्थना बेहरेने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे . या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रार्थना हिरव्या रंगाच्या साडीत मनमोहक डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओत प्रार्थनाच्या अदा आणि लूक पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. या व्हिडिओला प्रार्थनाने राजसा, जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हांविण बाई कोणता करू शिणगार सांगा तरी काही, असा मजेशीर कॅप्शन दिला आहे. सध्या या व्हिडिओवर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. प्रार्थनाने मितवा, कॉफी आणि बरंच काही, अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.