‘या’ मालिकेतून पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार प्रार्थना बेहेरे; अभिनेता श्रेयस तळपदेची मिळाली साथ


टेलिव्हिजनपासून चित्रपटसृष्टीपर्यंत यशस्वीरीत्या प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. तिच्या करिअरच्या प्रवासाला सुरुवात झाली ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेत तिने अर्चना लोखंडे हिच्या लहान बहिणीचे पात्र निभावले होते. यातून तिला बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली होती. पण तिला खरी लोकप्रियता मिळाली ती म्हणजे ‘मितवा’ या चित्रपटातून. या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मग तिच्या करिअरची गाडी अशी धावली की, तिला लागोपाठ चित्रपट मिळाले आणि तिने खूप प्रसिद्धी मिळवली. आता पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर पदार्पण करणार‌ आहे. यासाठी तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत.

प्रार्थना बेहेरे ही लवकरच झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहचणार आहे. या मालिकेचे प्रोमो गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. मात्र अजून प्रार्थना बेहेरेचा चेहरा दिसला नाही. पण ती या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत श्रेयस तळपदे दिसणार आहे. हे दोन्ही स्टार छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक या मालिकेबाबत खूप उत्सुक आहेत. (Prarthna behere will enter in television by this serial)

महाराष्ट्र ई-टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थना बेहेरेने तिचा करिअरबाबत सांगितले आहे. तसेच तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्याबाबत देखील वक्तव्य केले आहे. तिने सांगितले की, “मागील दोन वर्षांपासून मला मालिकांच्या खूप ऑफर येत होत्या. परंतु तेव्हा मी केवळ चित्रपटात काम करण्याचे ठरवले होते. त्यामुळे मी मालिकांना जाणूनबुजून नकार देत होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून मी कोणत्याही चित्रपटात दिसले नाही. मला सतत मी चित्रपटात कधी दिसणार आहे हा प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे मला एक कळलं की, प्रेक्षकांना मला पाहायचे आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मी मालिकेतून पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे.”

प्रार्थना ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये तिची एक झलक बघण्यासाठी प्रेक्षक उतावीळ झालेले असतात. तिने याआधी ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हॉटसऍप लग्न’, ‘ती आणि ती’, ‘मस्का’, ‘फुगे’, ‘लग्न मुबारक’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना कपूरने बहीण करिश्मा कपूरसोबत मेजवानीचा लुटला भरपूर आनंद; मात्र नंतर जे झाले…

-कपिल शर्मा अन् भारती सिंगचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून पळून गेली त्यांची फॅन; पाहा हा मजेदार व्हिडिओ

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक


Leave A Reply

Your email address will not be published.