Thursday, August 7, 2025
Home मराठी माझ्या बायकोचा पायगुण…झी मराठीवर पुन्हा एन्ट्री करताना प्रसाद जवादे भावुक

माझ्या बायकोचा पायगुण…झी मराठीवर पुन्हा एन्ट्री करताना प्रसाद जवादे भावुक

झी मराठी वाहिनीवर सध्या नव्या मालिका सुरु होत आहेत. ‘झी मराठी’ने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन मालिकांची घोषणा केली होती. यानुसार या दोन्ही मालिकांच्या प्रक्षेपणाला आता सुरुवात झाली आहे. अशातच ‘पारु’ या मालिकेद्वारे झी मराठी वाहिनीवर पुन्हा एन्ट्री केलेला अभिनेता प्रसाद जवादे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

‘पारु’ या मालिकेत प्रसाद आदित्य किर्लोस्करची भूमिका साकारत आहे. दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना प्रसादने नविन मालिका आणि खऱ्या आयुष्यात नव्याने सुरु केलेल्या संसारावर भाष्य केलं. ‘माझ्या बायकोचा पायगुण आहे. मला वर्षाच्या सुरुवातीला काम मिळालं. या मालिकेचं शूट साताऱ्यात होतंय आणि लग्न झाल्यावर पहिल्यांदाच इतक्या दूर शूट करतोय. पण अमृताची साथ आहे तर हा नवीन प्रवास नक्कीच यशस्वी होईन.’ अशी भावना प्रसादने यावेळी व्यक्त केली आहे.

झी मराठीवर पुन्हा एन्ट्रीवर भाष्य करताना प्रसाद म्हणाला, माझ्यासाठी झी मराठीवर काम करणे म्हणजे घरी परतण्यासारखे आहे. माझी आई आणि अमृताची आई दोघी अतिशय खुश आहेत. कारण मी पुन्हा झी मराठीवर दिसणार आहे.

तसेच, मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना प्रसाद म्हणाला, आदित्य किर्लोस्करच्या भूमिकेसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. माझा मित्र-परिवार तर हेलिकॉप्टरच्या माझ्या एन्ट्री शॉटवर एकदम फिदा आहे. एक श्रीमंत घराण्याचा मुलगा पण आपल्या आईच्या शब्दाबाहेर नसणारा अशी व्यक्तीरेखा आहे.

आदित्य एक श्रीमंत घरातला मुलगा आहे तर त्याचा लुक जबरदस्तच असला पाहिजे. मी काही महिन्यापासून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरवात केली आणि प्रोमो आणि शो मध्ये ती मेहनत दिसून येत आहे म्हणून मी संतुष्ट आहे. आदित्य किर्लोस्करच्या खूप शेड्स आहेत जसा-जसा शो पुढे जाईल तुम्हाला कळेलच. प्रसाद आणि आदित्य मध्ये काही साम्य गोष्टीही आहेत. त्या दोघांमध्ये सगळ्यात मोठं साम्य म्हणजे आईवर प्रचंड प्रेम करतात. आदित्यला महागड्या आणि स्टयलिश गाड्यांचा खूप शोक आहे आणि प्रसादला ही स्पोर्ट्स कार खूप आवडतात. प्रेक्षकांना हेच सांगेन की आतापर्यंत जितकं प्रेम देत आलात त्याहुन जास्त प्रेम ह्या भूमिकेला आणि ‘पारू’ ला द्या. असं आव्हान प्रसादने यावेळी केलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘जेव्हा माझ्या भावाने इस्लाम धर्म स्विकारला तेव्हा…’, विक्रांत मेस्सीने सांगितली ‘ती’ गोष्ट
अॅडमिट कार्डवर सनी लिओनीचा फोटो; ‘त्या’ तरुणानं दिलं स्पष्टीकरण, मला माहिती नाही…

हे देखील वाचा