मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. सतत त्याचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. तो आपल्या पत्नीबरोबरही अनेक रिल्समध्ये पाहायला मिळाला असून त्यांच्या रिल्स व्हिडिओ सोशल मीडियावर राडा घातला होता. त्याशिवाय तो आपल्या कुटुंबियाचे देखिल फोटो शेअर करत असतो. पती-पत्निचे रील्स सतत व्हायरल होत असतात अशातच अभिनेत्याने यावर आपली प्रतिक्रिया व्याक्त केली आहे.
प्रसाद ओक (Prasad Oak) जेवढा अभिनयासाठी ओळखला जातो तेवढाच आपल्या वैयक्तीक आयुष्यासाठी देखिल चर्चेत असतो. पत्नी मंजिरी ओक (Manjiri Oak) आणि तो सतत आपल्या वेळामध्ये रिल्स बनवून चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. प्रसादला कायमच त्यांची पत्नीची साथ मिळते. नुकतंच ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोन’ (Maharashtra’cha Favorite kon) या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रसाद आणि मंजिरी यांनी रेड कार्पेटवर एकत्र हजेरी लावली होती.
पुरस्कार सोहळ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना एका पत्रकाराने प्रसादला प्रश्न विचारला की, ‘तुम्ही दिवसाला किती रील्स बनवता?’ यावर प्रसादने उत्तर देत म्हणाला की, “नाही असं काही नाही आम्हा दोघांच्या आयडिया असतात. कधी तिला सुचतं कधी मला सुचतं, लोकांचं मनोरंजन करणं हा आपला धर्म आहे.”
View this post on Instagram
प्रसादने आजपर्यत मराठीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट धर्मवीर चांगलाच गाजला होता. त्याशिवाय या चित्रपटामधील प्रसादच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुकही केले होते. लवकरच धर्मवीर चित्रपटाचा भाग 2 देखिल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या प्रसाद ओक मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या कार्यक्रमामध्ये परिक्षण म्हणून काम करत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आजपासून तुझं नाव गांजा काळे…’,राज ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारी गजानन काळेंना अभिजित बिचुकलेंचे सडेतोड उत्तर
ये चाॅंदसा रोशन चेहरा! जिनेलिचा पांढऱ्या साडीवर ऑथेंटिक लूक