Friday, March 29, 2024

‘आजपासून तुझं नाव गांजा काळे…’,राज ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारी गजानन काळेंना अभिजित बिचुकलेंचे सडेतोड उत्तर

बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेता अभिजित बिचुकले हे सतत आपल्या वक्तव्यामुळे वादाचा घेऱ्यात अडकलेले असतात. मात्र, यावेळेस त्यांच्या विषयी मनसे पक्षाचे नेते गजानन काळे यांनी राऊत शिंदे  याच्यावर टिका करत असताना अभिजित बिचुकले यांच्या नावाचा उल्लेख केला असून त्यांना ‘सेक्रेड गेम‘या वेबसिरिजमधील नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या भूमिकेशी त्यांची तुलना केली आहे. त्यामुळे अभिजितजींनी देखिल गजानन काळे यांना सडेतोड प्रतिउत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे पक्षाचे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी एका कार्यक्रमादरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टिका करत असताना अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) यांच्या नावाचा उल्लेख केला असून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्या ‘सेक्रेड गेम’ या वेबसिरिजमधील भूमिकेशी तुलना करत असताना गजानन काळे म्हणाले की, “संजय राऊत सकाळी सकाळी कडक गांजा मारून असतात. सेक्रेड गेम्समधला नवाजुद्दीन सिद्धीकीला जसं वाटतं की आपणच देव आहोत, तसंच संजय राऊतांना वाटतं. इतका आत्मविश्वास महाराष्ट्रात दोनच व्यक्तीकडे आहे. एक म्हणजे संजय राऊत आणि दुसरे म्हणजे अभिजीत बिचुकले. असं म्हणत त्यांनी अभिनेत्यांचा चिमटा काढला होता.”

यानंतर अभिजित बिचुकले यांनी देखिल एका मुलाखतीदरम्यान गजानन काळे यांना प्रतिउत्तर देत म्हणाले की, “राज ठाकरे आमचे बंधू आहेत. मला त्यांना सांगायचं आहे, की त्यांचा जो पदाधिकारी आहे, गजानन काळे त्याला आज मी गांजा काळे असं नाव देतो. संपूर्ण महाराष्ट्राने हे लक्षात ठेवावं. संजय राऊतांचे आणि तुमचं काय वैर असेल ते असेल. पण तो मला गांजा ओढतो बोलला. गजानन काळेच्या 700 पिढ्यांना अभिजीत बिचुकलेची औकात माहिती आहे का? अभिजीत बिचुकलेची जात, धर्म महाराष्ट्राच्या नावात आहे.”

 

View this post on Instagram

 

बिचुकलेंनी देखिल गजानन काळे यांना सडेतोड उत्तर देत त्यांच्यावर संताप व्यक्त केला, त्याशिवाय त्यांनी आपली प्रतिक्रिय व्यक्त करत असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आपला भाऊ मानतो असाही त्यांनी उल्लेख केला होता. बिचुकलेंच्या या उत्तरानंतर गजानंन काळे यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ये चाॅंदसा रोशन चेहरा! जिनेलिचा पांढऱ्या साडीवर ऑथेंटिक लूक
नैना तेरे कजरारे है! मृणाल ठाकूरचे प्रेमात पाडणारे फोटो

 

हे देखील वाचा