Thursday, April 18, 2024

‘पठाणमधून पगार आला नाही का?’, दीपिकाला इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना पाहून युजरची कमेंट, Video

बॉलिवूडचा आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा कोणता? असा प्रश्न जर विचारला, तर सिनेप्रेमींच्या ओठांवर चटकन नाव येईल ते म्हणजे ‘पठाण’ या सिनेमाचे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनित ‘पठाण‘ या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा गल्ला जमवला आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. विशेष म्हणजे, रिलीजपूर्वी सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून चांगलाच गदारोळ माजला होता. तिला प्रचंड ट्रोलही करण्यात आले होते. मात्र, त्याचा सिनेमावर काडीमात्र फरक पडला नाही. अशात दीपिकाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

‘पठाण’ (Pathaan) सिनेमाच्या यशानंतर दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिची सर्वत्र चर्चा रंगलीये. मात्र, आता तिचा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो यापूर्वी कुणीही पाहिला नसेल. तसेच, कुणी कल्पनाही केली नसेल. खरं तर, दीपिकाला आरामदायी बिझनेस क्लास सोडून इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना स्पॉट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ती वॉशरूमला जाण्यासाठी वाट बनवताना दिसत आहे.

स्वत:ला लपवताना दिसली दीपिका
असा दावा केला जात आहे की, दीपिकाने स्वत:ला लपवण्याचा खूप प्रयत्न केला. यादरम्यान तिने कुणाशीही संवाद साधला नाही. तिने स्वत:ला लपवण्यासाठी नारंगी रंगाचे सैल जॅकेट परिधान केले होते. तसेच, डोक्यावर टोपीही घातली होती. मात्र, हे अद्याप स्पष्ट नाहीये की, तिने कुठून कुठपर्यंत प्रवास केला आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाला ‘पठाण’साठी 10 कोटी रुपये मानधन मिळाले आहेत. अशात, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर एकाने कमेंट करत म्हटले की, “पठाणमधून पगार आला नाही का?” तसेच, दुसऱ्या युजरने तिची प्रशंसा करत म्हटले की, “ती मातीशी खूपच जोडलेली आहे. तिच्या शून्य अहंकार आहे.”

शाहरुखसोबत शेअर केलेला व्हिडिओ
दीपिकाने नुकतेच स्किन केअर ब्रँड लाँच केला. तिने काही स्किन केअर रूटनेमध्ये सामील होण्यासाठी शाहरुख खान (Shahrukh Khan) याची निवड केली होती. दीपिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दीपिकाने शाहरुखसोबतचा व्हिडिओही पोस्ट केला होता. या व्हिडिओत शाहरुख दीपिकाच्या स्किन केअर ब्रँड 82Eच्या अनेक ब्युटी प्रॉडक्टचा रिव्ह्यू करताना दिसला. दीपिकाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हे सर्वांनाच माहिती आहे की, मी माझी कारकीर्द या हँडसम व्यक्तीसोबत सुरू केली होती. अशात आतापर्यंत आम्ही चार सिनेमे एकत्र केले आहेत. यावेळी आम्ही स्किन केअर रूटीनसाठी एकत्र आलो आहोत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

शाहरुखसोबत इंडस्ट्रीत आलेली दीपिका
दीपिका पदुको हिने 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 2007मध्ये रिलीज झालेल्या ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om) या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. या सिनेमात शाहरुख खान याने पहिल्यांदा तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. यानंतर दोघेही ‘चेन्नई एक्सप्रेस’ (2013), हॅप्पी न्यू इअर (2014) आणि आता ‘पठाण’ (2023) सिनेमात झळकले आहेत. (actress deepika padukone flies in economy class video goes to viral see here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाळिशी पार करणाऱ्या अभिनेत्रीने भर थंडीत बिकिनीत घालून वाढवले तापमान, युजर्सही म्हणाले, ‘यार ये कितनी…’
अंगावर फक्त बेडशीट अन् हातात कॉफी, ‘बिग बॉस 16’ फेम प्रियांकाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल

हे देखील वाचा