लोकप्रिय दिग्दर्शक प्रविण तरडे यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. या चित्रपटाची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक यांची झाली होती. प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. मात्र आता प्रसाद ओक यांचे एक भाषण चर्चेत आले आहे, ज्यामध्ये त्यांनी धर्मवीर चित्रपटाच्या कथेबद्दल महत्वाचे विधान केले आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. ठाणे जिल्ह्याचे शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. चित्रपटाने संपूर्ण देशभरात कमाईचे नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. चित्रपटात अभिनेते प्रसाद ओक यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या या भूमिकाचे प्रचंड गाजली होती. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी चित्रपटाची कथाच खोटी असल्याचे सांगितले आहे. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रसाद ओक असे का म्हणाले याबद्दलचा खुलासा होतो.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये प्रसाद ओक म्हणतात की, “दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी खरी आहे. मंंगेश देसाई यांनी या चित्रपटाबद्दल कल्पना सांगितली असता गुगलवर सर्च केले. त्यावर फक्त सिंघानिया रुग्णालय आणि आणखी एक- दोन किस्से इतकीच माहिती होती.मात्र जशीजशी माहिती गोळा करायला लागलो. तेव्हा अनेक किस्से समोर यायला लागले. तेच चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहेत.”
याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, “ज्या माणसाला सगळी जनता देव मानते त्या माणसाची भूमिका माझ्या वाट्याला आली, त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. परंतु ही भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारण्याचे आवाहन माझ्यासमोर होते. त्यामुळेच सतत टेंशनही यायचे. त्यांचे फोटो, व्हिडिओ पाहून मी ही भूमिका साकारली. मी प्रत्येक शॉट घेताना त्यांचे फोटो पाहायचो, पाया पडायचो आणि आशिर्वाद घ्यायचो.” दरम्यान प्रसाद ओक यांच्या या व्हायरल व्हिडिओची सध्या समाजमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा –बापरे! कॉमेडियन भारती सिंगने सर्वांसमोर केले या दाक्षिणात्य अभिनेत्याला किस, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेता बनला ‘बापमाणूस’, ११ दिवसांनी दाखवली लेकाची झलक
राणांच्या मंचावर गोविंदाच्या भाषणाची हवा! लाखोंच्या गर्दीने धरला अभिनेत्यासोबत ठेका