Friday, March 31, 2023

राणांच्या मंचावर गोविंदाच्या भाषणाची हवा! लाखोंच्या गर्दीने धरला अभिनेत्यासोबत ठेका

राज्यात नुकताच दहिहंडीचा जल्लोश पाहायला मिळाला. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी राज्यभरात दहिहंडीचा जल्लोश पाहायला मिळाला होता. यावेळी राज्यभरात अनेक ठिकाणी मोठमोठ्या दहिहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सध्या सोशल मीडियावर अभिनेता गोविंदाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो दहिहंडीच्या कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहे. काय आहे हा व्हायरल व्हिडिओ, चला जाणून घेऊ. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, राज्यभरात नुकताच दहिहंडीचा मोठा जल्लोश पाहायला मिळाला. यामध्ये भाजपा खासदार नवनीत राणा यांनी मोठ्या दहिहंडीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर सिने जगतातून अभिनेता गोविंदाही उपस्थित राहिला होता. या कार्यक्रमात अभिनेता गोविंदाने चांगलीच धमाल केलेली पाहायला मिळाली.

सध्या गोविंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता गोविंदा मंचावर “ही इतकी गर्दी पाहून खुप आनंद झाला. इतका आनंद मला कधीच झाला नाही लव यु ऑल,” म्हणताना दिसत आहे. त्यानंतर अभिनेता गोविंदाने धमाकेदार डान्सही सादर केला. जो पाहून तरुणाईलाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. हजारोंच्या गर्दीने अभिनेता गोविंदासोबत ठेका धरला, ज्याचा सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, यंदा सर्वच मोठमोठ्या दहिहंडीच्या कार्यक्रमांना सिने जगतातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कार्यक्रमाला अभिनेत्री श्रद्धा कपूरला बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमातील श्रद्धाचा मराठी भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – काय सांगता! हॉलिवूडच्या ‘या’ जोडीने एकाच महिन्यात केले दुसऱ्यांदा लग्न
सलमान- आमिर नाही, तर बॉलिवूडमधल्या फक्त ‘या’ अभिनेत्यासोबत काम करायचं रॉकीभाईचं स्वप्नं
राजूच्या तब्येतीविषयी त्याच्या कुटुंबाकडून महत्त्वाची माहिती, ‘या’ अभिनेत्याने ट्वीट करत दिली अपडेट

हे देखील वाचा