Friday, August 1, 2025
Home मराठी प्रथमेश परबला झालीये ‘लग्नाची घाई’, जाणून घ्या कोण आहे होणारी नवरी?

प्रथमेश परबला झालीये ‘लग्नाची घाई’, जाणून घ्या कोण आहे होणारी नवरी?

सध्या व्हिडिओ अल्बमचं वारं तरुणाईच्या अंगात शिरलं आहे. अनेकांना हे म्युझिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आवडत आहेत. तसेच कलाकारांना देखील या नवीन व्हिडिओ अल्बममधून काम करण्यास आवडत आहे. अनेक तरुणांना नवीन संधी मिळत आहे. अशातच ‘टाईमपास’ या चित्रपटातून नावारूपाला आलेला अभिनेता प्रथमेश परब त्याच्या आगामी व्हिडिओ अल्बममुळे चर्चेत आला आहे. त्याचा ‘लग्नाची घाय’ हा नवीन अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचं हे नवंकोरं गाणं प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार झाले आहे. हे गाणं लय भारी म्युझिकच्या बॅनरखाली तयार होत आहे.

‘बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश’ या गाण्याचा यशानंतर लय भारी म्युझिकच्या बॅनरखाली निर्माते ‘पोरीला लागलेय लग्नाची घाय’ हे नवीन गाणे येत आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन महिन्यांपूर्वी हे गाणे यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. केवळ दोन महिन्यात गाण्याला 1 लाख 35 हजारापेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अशातच लय भारी म्युझिकने आणखी एका गाण्याची घोषणा केली आहे. या गाण्यात प्रथमेश आणि कोमलची जोडी दिसणार आहे. त्यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्यामुळे आता सगळे त्यांच्या या नवीन गाण्याची वाट पाहत आहे.

प्रथमेश आणि कोमलचा डान्स तरुणाईलाच नव्हे, तर सर्वच वयोगटातील रसिकांना आकर्षित करणारा आहे. बॅाब आणि कोमल यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. बॉब आणि कोमल हे लय भारी म्युझिकचे चॅनेल हेडही आहेत. गीतकार राज इरमाली यांनी लिहिलेलं हे गाणं, राज इरमाली आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं असून, राज इरमाली यांनी संगीतबद्ध केलं आहे. किशोर दळवी यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. यंदाच्या लगीनसराईत हे गाणं फुल टू धमाल करत वऱ्हाडी मंडळींना ताल धरायला लावणार आहे. (prathmesh parab lagnachi ghay song is out)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ह्याच्या पर्सनॅलिटीत काय बी नाय’, प्रथमेश परबबाबत ‘हे’ काय बोलून गेला दिग्गज अभिनेता

जेव्हा प्रथमेश परब दिल्लीच्या रेड लाईट एरियामध्ये जातो, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा

हे देखील वाचा