Friday, July 5, 2024

प्रतीक सहजपालने घेतली चाहत्यांची शाळा, महिलांवर केलं ‘हे’ मोठ्ठं वक्तव्य

‘बिग बॉस सीझन १५’चा उपविजेता प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) त्याच्या बिनधास्त अंदाजासाठी खूप प्रसिद्ध आहे. या स्टाइलच्या जोरावर प्रतीकने टीव्हीच्या प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस’मधून स्टारडम बनवले. अशा स्थितीत प्रतीक सहजपालने चाहत्यांना फटकारत, त्यांना महिलांच्या सन्मानाचा धडा शिकवला आहे. या प्रकरणाबाबत प्रतीकने रागाने त्याच्या चाहत्यांना खडे बोल सुनावले. मात्र, असे फार कमी कलाकार आहेत, जे त्यांच्या चाहत्यांच्या विरोधात जातात. 

प्रतीकने चाहत्यांना फटकारले
खरं तर प्रतीक सहजपालने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चाहत्यांबाबत एका गंभीर विषयावर ट्वीट केले आहे. प्रतीक सहजपालने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “जे माझ्या #PratikFam नावावरून आई आणि बहिणीला शिवीगाळ करत आहेत आणि अपमानास्पद वागणूक देत आहेत, त्यांनी लगेचच #PratikFam सोडून द्यावे.” या शब्दांत चाहत्यांची शाळा प्रतीकने सांगितले की, “आपण सर्वांच्या माता-भगिनींचा मनापासून आदर केला पाहिजे. कारण प्रत्येकाची आई आणि बहीण समान असते. असे लज्जास्पद कृत्य करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे.” (pratik sehajpal scold to fans for respecting women)

चाहत्यांनी केलं प्रतीकचं कौतुक
#PratikFamच्या चाहत्यांच्या चुकीच्या वागण्यावर हा राग साहजिक असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते प्रतीक सहजपालच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. एका ट्विटर युजरने प्रतीकच्या ट्वीटचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की, “तू दररोज तुझ्या स्वत:च्या स्टाईलने चाहत्यांच्या हृदयात जागा बनवत आहेस.” या गंभीर विषयावर प्रतीकची हा बिनधास्त अंदाज वाखाणण्याजोगा असून, तो आजच्या तरुणांसाठी एक आदर्श म्हणून काम करत असल्याचे इतर युजर्सने म्हटले आहे.

प्रतिक सहजपाल नुकताच भारती आणि हर्ष लिंबाचिया यांच्या टीव्ही शो ‘द खतरा’मध्ये दिसला होता. याशिवाय प्रतीक पुढील वर्षी रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी सीझन १२’मध्येही सहभागी होताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा