Tuesday, July 9, 2024

बिग ब्रेकिंग! ‘महाभारता’तील ‘भीम’ काळाच्या पडद्याआड; आर्थिक तंगीने होते ग्रस्त

कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेमधील ‘भीम’ हे पात्र साकारणाऱ्या दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे. ते अभिनेते म्हणजे, प्रवीण कुमार सोबती होय. प्रवीण यांनी दिल्लीच्या अशोक विहार येथील घरी वयाच्या ७६ वर्षी अखेरचा श्वास घेतला. निधनापूर्वी ते खूप काळापासून आजारी होते. त्यांना पाठीचा त्रास होता. काही महिन्यांपूर्वी त्यांचे ऑपरेशनही झाले होते. मात्र, त्यांना चालता फिरता येत नव्हते. तसेच ते आर्थिक तंगीचाही सामना करत होते. खरं तर प्रवीण हे मूळचे पंजाबच्या तरणतारणचे होते.

प्रवीण यांच्या निधनामुळे कलाविश्व दु:खात असून कलाकार त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली जात आहे.

प्रवीण कुमार सोबती यांची एकुलती एक मुलगी निपुनिकाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “वडिलांचे निधन काल रात्री ९.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते गेल्या काही वर्षांपासून खूप आजारी होते. काल रात्री त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची ऑक्सिजनची पातळीही कमी झाली होती. हृदयविकाराच्या झटक्यानंतर आम्ही डॉक्टरांना फोन केला आणि घरी रुग्णवाहिका बोलावली, पण डॉक्टर घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.”

पुढे बोलताना तिने की, “वडिलांना बराच काळ खोकला होता, जो बराच होत नव्हता. १० वर्षांपूर्वी दिल्लीतील बसंतकुज येथील रुग्णालयात मणक्याचे ऑपरेशनही झाले होते, जे यशस्वी होऊ शकले नाही. त्यांना नीट चालता फिरता येत नव्हते. त्यामुळे त्यांना अनेकदा इतरांची किंवा लाकडाची मदत घ्यावी लागायची.”

प्रवीण कुमार सोबती यांना सर्वाधिक लोकप्रियता बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मधील भीमाची भूमिका करून मिळाली. प्रवीण त्यांच्या उंचीसाठी (६.६ इंच) ओळखले जायचे. त्यामुळेच त्यांना बहुतेक चित्रपटांमध्ये व्हिलन आणि बॉडीगार्डच्या भूमिका मिळायच्या.

त्याच्या उंचीमुळे त्यांना ‘महाभारत’मध्ये भीमाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. त्यांनी ३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी ते हातोडा फेक आणि थाळीफेक खेळाडू होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये दोनदा भारताचे प्रतिनिधित्व केले होते. एक म्हणजे १९६८ साली मेक्सिको ऑलिम्पिक आणि दुसरी १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिक. अभिनय करण्यापूर्वी ते बीएसएफ जवानही होते.

प्रवीण यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक यश संपादन केले असेल, पण ते आयुष्याची लढाई लवकरच हरले. प्रवीण यांना मृत्यूपूर्वी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत त्यांनी सरकारकडे मदतीचे आवाहनही केले होते. गेल्या डिसेंबरपासून प्रवीण आजारी होते. याच कारणामुळे ते घरीच असायचे. घरी त्यांची पत्नी वीणा त्यांची काळजी घ्यायच्या. मात्र, आता त्यांच्या निधनाने एक दिग्गज अभिनेता कलाविश्वाने गमावला आहे.

हे देखील वाचा