Thursday, April 18, 2024

“आणखी किती वर्ष प्रेक्षकांना त्याच्या…” प्रवीण तरडे यांनी महाराष्ट्र्र शाहीर सिनेमाबद्दल केलेली ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

मागील अनेक दिवसांपासून ज्या सिनेमाची आतुरता प्रत्येक मराठी प्रेक्षकाला होती, तो सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे, आणि त्याचे नाव आहे ‘महाराष्ट्र शाहीर’. केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर या सिनेमाने मागील अनेक दिवसांपासून चांगलाच बज निर्माण केला होता. अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या अतिशय उत्तम प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर बेतलेल्या या सिनेमाला मोठ्या पडद्यावर साकारण्याचे शिवधनुष्य त्यांचेच नातू असलेल्या केदार शिंदे यांनी उत्तम पद्धतीने पेलल्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा दिग्दर्शक, लेखक आणि उत्तम अभिनेता असलेल्या प्रवीण तरडेने देखील या सिनेमाचे कौतुक करताना एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रवीण तरडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रवीण यांनी लिहिले, “‘महाराष्ट्र शाहीर’ तुमचा आमचा सिनेमा..
एखादी बायोपिक करणं हेच मुळात शिवधनुष्य असतं आणि त्यात जर ती घरातल्याच माणसावर असेल तर काय घेऊ आणि काय नको, असं होण्याची जास्त शक्यता असते. पण ती शक्यता टाळून केदारने शाहीर साबळेंचे आयुष्य काय वेगवान पध्दतीने उलगडलंय.. हॅट्सऑफ मित्रा.. अंकुश चौधरी हा माणुस आणखी किती वर्ष प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पाडणार आहे.. तू अफलातून शाहीर वठवलाय मित्रा, ते करताना फक्तं अनुभवच नाही तर मेहनतसुध्दा दिसतीये तुझी.. सना खुपच गोड दिसली आणि जणु काही तिचा दहावा सिनेमा असावा ईतका सराईत अभिनय पहिल्याच चित्रपटात केलाय.. छोट्या मोठ्या भुमिका करणारे सगळेच भन्नाट. सर्वात छोटा शाहीर एकदमच खतरनाक ठरला.. शुभांगी सदावर्ते भन्नाट, अक्षय टाकचा राजा मयेकर भारी.. निर्मिती सावंत यांनी धमाल केलीये..
शाहीर साबळेंच्या कार्यकर्तृत्वाला सलाम
केदार आणि अंकुश ला फाईव्ह स्टार रेटींग
नक्की बघा आपला महाराष्ट्र शाहीर,”

दरम्यान शाहीर साबळे यांच्या बायोपिकमधून केदार शिंदे यांची कन्या असलेल्या सना शिंदेने मराठी मनोरंजनविश्वात पदार्पण केले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक शाहीर साबळे यांचे नातू असलेल्या केदार शिंदे यांनीच केले आहे. सोशल मीडियावरही या सिनेमाबाबत सकारात्मक बातम्या पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांच्या ‘त्या’ कृत्यांनंतर लक्ष्मीकांत यांनी दाखवलेल्या नम्रतेमुळे त्यांनी जिंकले होते लोकांचे मनं

काश्मीर फाइल्सला पुरस्कार न मिळाल्यामुळे नाराज अनुपम खेर यांचा फिल्मफेयर निशाणा म्हणाले, ‘इज्जत महाग गोष्ट…’

 

हे देखील वाचा