Monday, January 26, 2026
Home कॅलेंडर ‘प्रेमाच्या नावाखाली त्याने माझी फसवणूक केली, आता धर्मांतरासाठी करतोय मारहाण’; अभिनेत्रीने फोडली अन्यायाला वाचा

‘प्रेमाच्या नावाखाली त्याने माझी फसवणूक केली, आता धर्मांतरासाठी करतोय मारहाण’; अभिनेत्रीने फोडली अन्यायाला वाचा

आजही आपल्या देशात जिथे एक बाजूला स्त्रीला देवी बनवून पूजलं जातं तिथे दुसऱ्या बाजूला पावलापावलावर स्त्रीचा अपमान केला जातो. मग ते तिला चूल आणि मूल या परंपरेमध्ये अजूनही अडकवणं असो वा फक्त एक शब्दाचा तीन वेळा उच्चार करून तिला एकटं पाडणं असो.

आजही अनेक ठिकाणी घरातल्या स्त्रीला मारझोड केली जाते. तिच्यासाठी अश्लील शब्दांचा वापर केला जातो, तिला शिवीगाळ केली जाते हे निरव सत्य आहे. याहीपेक्षा आणखीन कटू सत्य काय आहे माहितीये.

दर पंधरा मिनिटांनी आपल्या भारतात एका स्त्रीवर बलात्कार केला जातो यामध्ये तिच्या वयाचंही भान ठेवलं जातं नाही. आपण म्हणाल मनोरंजन विश्वातील वेबसाईटवर हा असा लेख का वाचायला मिळतोय? आता आपण जी बातमी वाचणार आहात ती एका अभिनेत्रीबाबत आहे.

https://www.instagram.com/p/CIqHuUnhneO/?utm_source=ig_web_copy_link

तिच्यासोबत जे काही घडलं आहे यानंतर आपल्या लक्षात येईल की, स्त्री मग ती कुठलीही असो… कलाक्षेत्रातील किंवा घरातील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील…ती आज सुरक्षित नाहीये. काय घडलं आहे या अभिनेत्रीसोबत चला पाहुयात!

टीव्ही अभिनेत्री प्रीती तलरेजाने तिचा नवरा अभिजीत पेटकर याच्यावर खळबळजनक आरोप केले आणि त्याच्याविरूद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. प्रीती सांगते की तीच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला जात होता. जेव्हा तीने धर्मांतरण करण्यास नकार दिला तेव्हा तीला मारहाण करण्यात आली.

घरगुती हिंसाचाराबद्दल प्रीतीने सोशल मीडियावर अनेक ट्विट्स केले. यापूर्वी तिने मुंबई पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी संपर्क साधला होता पण काहीच कारवाई झाली नव्हती, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमओ यांना टॅग करून तिने आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणातील ताजी माहिती अशी की, आता खडकपाडा कल्याण पोलिसांनी प्रितीच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रीती तलरेजाचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले असून तिच्या चेहऱ्यावर खुणा आहेत. प्रीतीच्या एफआयआरची एक प्रत सुनैना होल्ले यांनी शेअर केली आहे. त्यांनी या प्रकरणी पाठिंबा दिल्याबद्दल भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि किरीट सौमैया यांचे आभार मानले आहेत.

तीन वर्षांपूर्वी प्रीतीने अभिजीत पेटकरशी लग्न केलं होतं. अभिजित हा पेशाने जिमचा मालक आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये प्रीती म्हणाली की अभिजीत मुस्लिम धर्माचा आहे. दोघांचंही लग्न मशिदीत झालं होतं. प्रितीने धर्मांतरण केलं नाही, परंतु नंतर अभिजीतने तिला धर्मांतरणासाठी जबरदस्ती करत मारहाण करण्यास सुरवात केली. मुस्लिम कायद्यानुसार त्यांना लग्नाचं प्रमाणपत्र देण्यात आलं नव्हतं.

https://twitter.com/preitytalreja/status/1345067094409408514?s=20

एका ट्विटमध्ये प्रितीने लिहिलं आहे की तिचा नवरा अभिजीत याने आपण मुस्लिम असल्याचं सांगितलं आहे. परंतु त्याच्याकडे धर्मांतरणाची कागदपत्रेच नाहीत. तो त्याच्या कागदपत्रांवर अभिजित पेटकर हेच नाव लिहितो. तीन वर्षांपासून तो प्रेमाच्या नावाखाली तीची फसवणूक करतोय. प्रीती ही टीव्ही सीरियल कृष्णदासीमध्ये झळकली होती.

हे देखील वाचा