Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड स्वत: च्याच मृत्यूची अफवा ऐकून संतापले अभिनेते प्रेम चोप्रा, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

स्वत: च्याच मृत्यूची अफवा ऐकून संतापले अभिनेते प्रेम चोप्रा, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियाच्या जगतात अनेकदा अनेक चांगल्या गोष्टी कानावर पडतात. त्याचप्रमाणे काही अफवाही ऐकायला मिळत असतात. यामध्ये अनेकदा कलाकारांच्या मृत्यूच्या अफवाही येत असतात. मीडिया जगतात असे काही लोक आहेत जे अभिनेत्यांबद्दल खोट्या अफवा पसरवतात. यामुळे कलाकारांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आता प्रेम चोप्रा (Prem Chopra) हे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आहेत. अनेक वर्षांच्या कारकिर्दीत खलनायक बनून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पण आज जेव्हा त्याला त्याच्या कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून मेसेज येऊ लागले आणि त्याच्या तब्येतीची विचारणा सुरू झाली तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यांना प्रेम चोप्रा जिवंत आहे का हे जाणून घ्यायचे होते. या कॉल्सद्वारे प्रेम चोप्रा समजले की त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरवल्या जात आहेत. 

आपल्या मृत्यूची अफवा आल्यानंतर अभिनेते प्रेम चोप्रा खूपच अस्वस्थ झाले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, “हे खूप दुःखद आहे. काही लोक माझ्या मृत्यू झाल्याची खोटी बातमी पसरवून इतरांना त्रास देत आहेत. पण मी इथे आहे आणि सर्व ठीक आहे. मला आज सकाळपासून खूप फोन आले आहेत. राकेश रोशन यांनी मला फोन केला, आमोद मेरा यांनी मला फोन केला. माझ्यासोबत असे कोणी का केले हे मला माहीत नाही. माझा मित्र जितेंद्रसोबत कोणीतरी असेच केले होते. चार महिन्यांपूर्वी जितेंद्रबद्दल अशी अफवा पसरली होती. आता ते थांबवण्याची गरज आहे.”

या वर्षी जानेवारी महिन्यात प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांची तब्येत बिघडली होती. दोघांना कोविड झाला होता आणि त्यानंतर दोघांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बरे झाल्यानंतर दोघांना घरी आणण्यात आले. आता दोघेही घरी स्वतःची पूर्ण काळजी घेत आहेत. प्रेम चोप्रा यांच्या कारकिर्दिविषयी बोलायचे झाले तर, ते अखेरचे  बंटी और बबली 2 मध्ये दिसले होते. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांनी कोणताही नवीन चित्रपट साईन केला नाही.

हेही वाचा –

अजूनही कायम आहे रवीनाची ब्युटी, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

समंथाची संपत्ती दिशा पटानीपेक्षाही जास्त, ताफ्यात जग्वार ते मर्सिडीज, ‘या’ महागड्या गाड्यांचा समावेश

मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यावर संतापला मराठी अभिनेता; थेट मुख्यमंत्र्यांनाच म्हणाला, ‘आमच्या हयातीत…’

हे देखील वाचा