Monday, April 15, 2024

समंथाची संपत्ती दिशा पटानीपेक्षाही जास्त, ताफ्यात जग्वार ते मर्सिडीज, ‘या’ महागड्या गाड्यांचा समावेश

सिनेसृष्टीत पाऊल ठेवताच कलाकारावर पैशांचा पाऊस होण्यास सुरुवात होते. मात्र, जर एखाद्या कलाकाराने सिनेसृष्टीत बराच काळ घालवला असेल, तर तो किती श्रीमंत असेल याची कल्पनाच केलेली बरी. अशीच एक अभिनेत्री आहे, जी कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. फक्त टॉलिवूडच नाही, तर बॉलिवूडमध्येही तिने आपलं नाणं खणकवलंय. ती अभिनेत्री इतर कुणी नसून समंथा रुथ प्रभू आहे. चला तर जाणून घेऊया समंथाकडे किती रुपयांची संपत्ती आहे.

जुबिली हिल्समध्ये आलिशान घर
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही हैदराबाद येथील जुबिली हिल्स (Hyderabad Jubilee Hills) येथे राहते. तिचे घर खूपच सुंदर आहे. याची सजावट अभिनेत्रीने खूपच शानदार पद्धतीने सजवले आहे. तिच्या घराला वॉर्म लूक देण्यासाठी घरामध्ये लाकडांचा वापर हा एक उत्तम पर्याय आहे. घरातील फर्निचर आणि इतर सजावटीचे सामानाची निवड ही समंथाच्या आवडीनुसारच आहे. तिच्या लिव्हिंग रूममध्ये लेदर सोफा आहे. तरीही, अभिनेत्रीने तिच्या बेडरूमची थीम एकदम सॉफ्ट ठेवली आहे. यासाठी तिने अधिकतर पेस्टल किंवा पांढऱ्या रंगाचा वापर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथाचे कार कलेक्शन
समंथाकडे शानदार कार कलेक्शनही आहे. यामध्ये रेंज रोव्हर वोग, पोर्शे कॅमेन जीटीएस, जग्वार एक्सएफ, मर्सिडीज बेंझ जी६३ एएमजी, ऑडी क्यू 7 आणि स्वँकी बीएमडब्ल्यू 7 सीरिज यांसारख्या महागड्या आणि लग्झरी गाड्यांचा समावेश आहे. समंथाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर माध्यमांतील वृत्तानुसार, ती एकूण 80 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. ती एका सिनेमासाठी जवळपास 3 ते 4 कोटी रुपये घेते. तसेच, बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर वृत्तानुसार ती 75 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथाचा घटस्फोट
अभिनेत्री समंथा मागील वर्षी तिच्या घटस्फोटाच्या निर्णयावरून चांगलीच चर्चेत आली होती. या घोषणेनंतर तिच्या चाहत्यांचे हृदय तुटले होते. अनेकांना या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. मात्र, समंथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांचे मार्ग वेगळे केले.(actress samantha ruth prabhu net worth her lavish hyderabad house)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क
आमिर खानने पीएम मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे केले कौतुक; म्हणाला, ‘देशाच्या लोकांना…’

हे देखील वाचा