Sunday, September 8, 2024
Home अन्य सत्तरच्या दशकातला अँग्री यंग मॅन पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणार ! सलीम – जावेद यांचा प्रवास जवळून बघता येणार…

सत्तरच्या दशकातला अँग्री यंग मॅन पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणार ! सलीम – जावेद यांचा प्रवास जवळून बघता येणार…

सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन म्हणून प्रसिद्ध होता. पडद्यावर व्यवस्थेच्या विरुद्ध जात न्याय मिळवून देणारा नायक अशी अमिताभची प्रतिमा होती. त्याकाळी हे चित्रपट प्रचंड गाजले. आजही ते सर्वांना आठवतात. अमिताभच्या या नायकाचे जनक होते दोन लेखक. ज्यांनी आपल्या लेखणीद्वारे हा नायक उभा केला. ते दोन लेखक म्हणजे सलीम खान आणि जावेद अख्तर, अर्थात सलीम – जावेद  

आता यांच्या चित्रपट कारकीर्दीचा आढावा घेणारा एक माहितीपट येतोय. हा माहितीपट २० ऑगस्ट रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहेत. “अँग्री यंग मेन” असं या माहितीपटाचं नाव आहे.   

अँग्री यंग मेन ही तीन भागांची ही माहितीपट मालिका सुपरस्टार सलमान खानच्या सलमान खान फिल्म्सद्वारे तसेच फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांचे एक्सेल एंटरटेनमेंट आणि झोया अख्तर आणि रीमा कागती यांचे टायगर बेबी फिल्म्स द्वारे निर्मित संयुक्त उपक्रम आहे. या माहितीपटाच्या दिग्दर्शिका नम्रता राव आहेत. ओये लकी लकी ओये इश्किया, बँड बाजा बारात आणि कहानी यांसारख्या चित्रपटांच्या संपादक म्हणून नम्रता ओळखल्या जातात. 

सलीम आणि जावेद यांनी १९७० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवून आणली होती. त्यांच्या जंजीर, शोले आणि दीवार सारख्या चित्रपटांनी समाजावर प्रभाव पाडला. त्यांना त्यांच्या चित्रपटांद्वारे बॉलीवूडमध्ये ब्लॉकबस्टर फॉरमॅटचा नव्याने शोध लावण्याचे श्रेय दिले जाते. स्टारचा दर्जा मिळवणारे ते पहिले भारतीय पटकथा लेखक म्हणूनही ओळखले जातात. २२ बॉलीवूड चित्रपट तसेच दोन कन्नड चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर, दोघांनी १९८२ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

या मालिकेचा कार्यकारी निर्माता सलमान खान आहे. या कार्यक्रमादरम्यान सलमान म्हणाला,  पापा आणि जावेद साहब यांना या चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना मी पाहिले आहे जे अगदी जादूमय होते. “सिनेमावरील त्यांच्या प्रेमाने संपूर्ण पिढीसाठी या कल्ट क्लासिक्सच्या रुपात एक मोठा वारसा मागे ठेवला आहे. व्यक्तिशः, मला भविष्यात त्यांना एकत्र काम करताना बघायला आवडेल, मला आशा आहे की चाहते आणि प्रेक्षकही या बाबतीत सहमत असतील. 

फरहान अख्तर यावेळी म्हणाला,  सलीम-जावेदचा प्रवास हा हिंमत, उत्कटता आणि हिंदी सिनेमाला विशेषत: लेखकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याच्या तीव्र आवेशाने चिन्हांकित होता. “ते यशस्वी झाले आणि त्यांनी एक छाप सोडली आहे जी आजही आहे,” 

प्राइम व्हिडिओचे डायरेक्टर, कंटेंट लायसन्सिंग, मनीष मेंघानी म्हणाले, प्राइम व्हिडीओच्या टीमसाठी अँग्री यंग मेन हा खरोखरच एक खास माहितीपट आहे, सलीम-जावेद यांनी केवळ सिनेमाचा कायापालटच केला नाही, तर समाजावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला. हाच प्रवास दाखवणाऱ्या या उत्कंठावर्धक माहितीपटावर सलमान खान फिल्म्स, एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

घटस्फोटाच्या अफवांमध्ये अभिषेक बच्चनने केली खास पोस्ट, कमेंट सेक्शनवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा