Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड मुन्ना भैय्या परतला ! पण प्रेक्षक म्हणाले की, बोनस एपिसोड की बोगस एपिसोड…

मुन्ना भैय्या परतला ! पण प्रेक्षक म्हणाले की, बोनस एपिसोड की बोगस एपिसोड…

प्राईम व्हिडीओच्या मिर्झापूर या लोकप्रिय मालिकेचा तिसरा सीझन रिलीज झाला तेव्हा सर्वांना मुन्ना भैयाची आठवण आली. तिसऱ्या सीझनमध्ये तो दाखवला गेला नाही आणि प्रेक्षकांनी त्याबद्दल तक्रार देखील केली होती. आता प्रेक्षकांच्या मागणीनुसार या मालिकेचा बोनस एपिसोड सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये मुन्ना भैया म्हणजेच अभिनेता दिव्येंदू परतला आहे. प्राइम व्हिडिओने एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

प्राइम व्हिडिओने एक पोस्टर शेअर केली आहे. यामध्ये गुड्डू पंडित म्हणजेच अली फजल, गोलू गुप्ता म्हणजेच अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि मुन्ना भैया म्हणजेच दिव्येंदू दिसत आहेत. यासोबत कॅप्शन लिहिले आहे, ‘महिनाअखेर बोनस? मुन्ना भैया यांनी व्यवस्था केली आहे. बोनस भाग पहा’. आता यावर यूजर्सकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. बोनस भाग सुमारे २५ मिनिटांचा आहे.

मात्र, बोनस एपिसोडची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये जो उत्साह दिसत होता, एपिसोड येताच तो विरून गेला. वास्तविक, दिव्येंदूची या एपिसोडमध्ये कोणतीही भूमिका नाही. सीझन ३ च्या सर्व एपिसोड्सचे डिलीट केलेले सीन एकत्र करून बोनस एपिसोड तयार करण्यात आला असून दिव्येंदू त्यात फक्त कथन करताना दिसत आहे. त्यामुळेच चाहत्यांना या सरप्राईजचा धक्का बसला आहे.

हा एपिसोड पाहिल्यानंतर यूजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत आणि संताप व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘प्राईम वाल्यांनो, हा बोनस एपिसोड होता की बकवास एपिसोड.?? मिर्झापूर सीझन 3 प्रमाणेच हा एपिसोड बकवास होता. मिर्झापूर सीझन 3 चा हा बोनस एपिसोड देखील पूर्णपणे मूर्खपणाचा ठरला. एका यूजरने लिहिले की, ‘प्रत्येक एपिसोडच्या डिलीट केलेल्या सीनमधून बोनस एपिसोड बनवून टाकू, कोणाला काय  कळेणार’. एका यूजरने लिहिले की, ‘मुन्ना भैय्याचा कोणताही सीन नाही. फक्त दोन हटवलेले दृश्य चांगले आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘या बोनस एपिसोडमध्ये पाहण्यासारखे काही नाही’.

आतापर्यंत मिर्झापूर मालिकेचे तीन सिझन आले आहे. पहिले दोन सीझन प्रचंड गाजले, पण तिसरा सीझन प्रेक्षकांना फारसा आनंददायी वाटला नाही. या मालिकेत पंकज त्रिपाठी कालिन भैय्याच्या भूमिकेत दिसत आहे. गेल्या दोन सीझनमध्ये दिव्येंदू त्याचा मुलगा मुन्नाच्या भूमिकेत दिसला होता, मात्र तिसऱ्या सीझनमध्ये तो नव्हता. आता बोनस एपिसोडमध्येही त्याची भूमिका नाही, त्यामुळे चाहते पुन्हा एकदा नाराज झालेले पाहायला मिळत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

स्त्री-२ नंतर आता लवकरच स्त्री-३ सुद्धा येणार; पहा काय म्हणाले दिग्दर्शक…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा