Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड स्त्री-२ नंतर आता लवकरच स्त्री-३ सुद्धा येणार; पहा काय म्हणाले दिग्दर्शक…

स्त्री-२ नंतर आता लवकरच स्त्री-३ सुद्धा येणार; पहा काय म्हणाले दिग्दर्शक…

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘स्त्री’चा सिक्वेल तब्बल सहा वर्षांनंतर १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला, याला समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद तर मिळालाच, पण चाहत्यांनीही चित्रपटाच्या कथेचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी चित्रपटाच्या सिक्वेलचे अपडेट शेअर केले आहे. 

दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘स्त्री 2’ च्या प्रचंड यशानंतर सोशल मिडीयावर प्रेक्षकांमध्ये ‘स्त्री’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाबद्दलच्या वाढत्या अपेक्षांविषयी खुलासा केला. या हॉरर-कॉमेडी सिक्वेलने केवळ प्रेक्षकांना आकर्षित केले नाही तर कथेच्या संभाव्य सीक्वलचे संकेतही दिले आहेत. ‘स्त्री 2’ला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल अमर कौशिक यांनी आश्चर्य व्यक्त केले. यासोबतच त्यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत ते सध्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असल्याचे सांगितले आहे. स्त्री 3 वर काम करणे खूप लवकर सुरु केले जाणार आहे असेही ते म्हणाले.

यासोबत ते म्हणाले, ‘अजून सुरुवातीचे दिवस आहेत. या यशाच्या भव्यतेने आपण अजूनही थक्क होतो. पण हो, तिसरा भाग बनवण्याचा दबाव आमच्यावरही वाढत आहे. स्त्री 2 ला इतके प्रेम मिळेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याचा तिसरा भाग देखील स्त्री 2 च्या क्लायमॅक्समध्ये थोडाफार दाखवला गेला होता.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, ‘स्त्री 2’ चंदेरी गावातील ‘सरकटा’ नावाच्या भूताचा सामना करण्याची कथा सांगतो, जो महिलांवर हल्ला करतो आणि त्यांचे अपहरण करतो. ‘स्त्री 2’ हा मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्सचा एक भाग आहे, ज्यामध्ये ‘मुंजा’ आणि ‘भेडिया’ सारख्या चित्रपटांचा सुद्धा समावेश आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि वरुण धवन यांचाही उत्तम कॅमिओ आहे.

या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्यासह पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ४३४.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट भारतात ५०० कोटींची कमाई करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

कार मध्ये गडबड आणि अभिनेत्रीने कंपनीवर दाखल केला ५० कोटींचा खटला…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा