‘असा’ व्हिडिओ पोस्ट करणे प्रिन्स नरुलाची पत्नी युविका चौधरीला पडले भलतेच महागात, थेट ठोकण्यात आल्या बेड्या

प्रिन्स नरुला आणि त्याची पत्नी युविका चौधरी हे प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल्सपैकी एक आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. युविका सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. मात्र तिने शेअर केलेला व्हिडिओ तिला चांगलाच महागात पडला आहे.

काही दिवसांपूर्वी युविका चौधरीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमुळे अभिनेत्री खूप ट्रोल झाली. हा व्हिडिओ ब्लॉग युविकाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता. यामध्ये तिने जातीयवादी शब्द वापरले होते. याच प्रकरणी हरियाणा पोलिसांनी सोमवारी (१८ ऑक्टोबर) युविका चौधरीला अटक केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Yuvikachaudhary (@yuvikachaudhary)

‘इतकी’ तास झाली कसून चौकशी
युविका चौधरीवर एका व्हिडिओमध्ये अनुसूचित जातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हिसारच्या हांसी पोलीस ठाण्याने तिची सुमारे तीन तास चौकशी केली. अभिनेत्रीविरुद्ध एससी/एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, नंतर तिला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. युविका मुंबईहून हांसीला पोहोचली होती. तिचे वकील अशोक बिष्णोई म्हणाले, “माझी क्लायंट उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासात सामील झाली आहे आणि ती सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहे.” आता उच्च न्यायालयात २४ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

सोशल मीडियावर करण्यात आली अटकेची मागणी
यावर्षी मे महिन्यात युविका चौधरीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिच्या विरोधात ट्विटरवर युविका चौधरीला अटक करा (#ArrestYuvikaChoudhary) ही मागणी ट्रेंड करत होती. लोकांनी युविकाकडे माफी मागण्याची मागणी घातली होती. प्रकरण वाढताच युविकानेही माफी मागितली होती. युविकाने एका ट्विटमध्ये लिहिले की, तिला या शब्दाचा अर्थ माहित नव्हता आणि यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ती माफी मागते.

मागितली माफी
युविका चौधरीने ट्वीटमध्ये लिहिले होते की, “नमस्कार मित्रांनो, मी माझ्या शेवटच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये वापरलेल्या शब्दाचा नेमका अर्थ मला माहित नव्हता. कुणाला दुखावणे हा माझा हेतू नव्हता. कोणालाही त्रास होईल असे मी काहीही करू शकत नाही. मी सर्वांची माफी मागते. मला आशा आहे की, तुम्ही सर्वांना माझा मुद्दा समजला असेल. सर्वांना खूप प्रेम.” या ट्वीटवरही युजर्सच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थ गेल्यानंतर शहनाझला पहिल्यांदाच मिळालं हसण्याचं कारण, आली ‘ही’ आनंदाची बातमी

-भारीच ना! ‘गुंडी’ बनून दबंगगिरी करताना दिसली सपना चौधरी, ठुमके सोडून हाती घेतली बंदूक

-फ्लॉप होता होता वाचलाय ‘बाजीराव मस्तानी’, ‘या’मुळे मध्येच चित्रपट सोडणार होती ‘काशीबाई’

Latest Post