Wednesday, March 27, 2024

भारीच ना! ‘गुंडी’ बनून दबंगगिरी करताना दिसली सपना चौधरी, ठुमके सोडून हाती घेतली बंदूक

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या डान्समुळे अनेकदा चर्चेत असते. तिचे फोलोव्हर्स केवळ हरियाणापुरते मर्यादित नाहीत, तर देश आणि विदेशातही सपनाचे चाहते आहेत. सपनाने ‘बिग बॉस’मध्ये पाऊल टाकल्यापासून तिला जगभरात ओळख मिळाली. अर्थात ती शो जिंकू शकली नाही, पण तरीही ती प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करते. यामुळेच तिचा प्रत्येक डान्स व्हिडिओ ट्रेंडिंग लिस्टमध्ये राहिला आहे. तिचे एनर्जीने भरलेले जबरदस्त डान्स प्रेक्षकांना वेड लावतात.

डान्सिंग क्वीनच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या सपना चौधरीचा डान्स एकदा पाहिल्यानंतर तो आयुष्यभर विसरणे कठीण आहे. सपना चौधरीची गाणी यूट्यूबवर प्रचंड वेगाने व्हायरल होतात. ज्यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम देखील मिळते. अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर तिने हे स्थान मिळवले आहे. जर तिचे कोणतेही नवीन गाणे आले, तर चाहते गाणे ऐकण्यासाठी आणि तिच्या डान्स मूव्ह्ज पाहण्यासाठी उत्सुक होतात. आजकाल तिचे एक व्हिडिओ गाणे यूट्यूबवर ट्रेंड होत आहे.

‘गुंडी’ गाण्यात ती एका वेगळ्या अवतारात दिसत आहे. सहसा प्रेक्षकांना तिला डान्सर म्हणून पाहायला आवडते. पण या व्हिडिओमध्ये ती हातात बंदूक धरताना दिसत आहे. सपना हरियाणाच्या धाकड मुलीच्या अंदाजात दिसत आहे. सुंदर दिसणाऱ्या सपनाचा लूक या गाण्यात खतरनाक आहे. ती एकटी अनेक पोलिसांशी लढते.

गाण्याचे बोल दमदार आणि जोशिले आहेत. एका पद्धतीने हे गाणे स्त्री शक्तीची गोष्ट सांगते. एक प्रकारे हे गाणे स्त्री शक्तीबद्दल बोलते. देशात अजूनही अनेक क्षेत्र आहेत जिथे महिलांवर अत्याचार होतात. कदाचित हे गाणे अशा स्त्रियांमध्ये शक्ती भरण्यासाठी केले गेले आहे.

सपना चौधरीचा हा दबंग अंदाज चाहत्यांना आवडत आहे. तसे पाहीले, तर हा तिचा पहिला व्हिडिओ नाही जो चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. चाहत्यांना देसी क्वीनचे प्रत्येक गाणे आवडते. म्हणूनच सपनाचे एक गाणे प्रदर्शित होताच, ते ट्रेंड व्हायला सुरुवात होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा कडकच ना! सपना चौधरीचे ‘पतली कमर’ गाणे रिलीझ; मिळाले १० लाखांपेक्षाही अधिक हिट्स

-सपना चौधरीच्या डान्सने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

-पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये सपना चौधरीचे देसी स्टाईलमध्ये फोटोशूट, साधेपणाने जिंकले चाहत्यांचे मने

हे देखील वाचा