Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड अक्षय कुमारच्या पृथ्वीराज सिनेमाविरोधात दाखल केलेल्या याचिकेविरोधात दिल्ली हायकोर्टाने सांगितले…

अक्षय कुमारच्या पृथ्वीराज सिनेमाविरोधात दाखल केलेल्या याचिकेविरोधात दिल्ली हायकोर्टाने सांगितले…

अभिनेता अक्षय कुमारचे अनेक सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज असून, एका रांगेत ते प्रदर्शित होणार आहे. अक्षय सध्या बॉलिवूडच्या सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक असून, त एकामागोमाग एक सिनेमे पूर्ण करत असून, ते सिनेमे बघण्यासाठी प्रेक्षकही तितकेच उत्सुक आहे. अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे ‘पृथ्वीराज.’ हा सिनेमा येत्या १० जूनला प्रदर्शित होणार असला तरी चित्रपटाने आतापासूनच लाईमलाइट आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. या ना त्या कारणामुळे हा सिनेमा सतत चर्चेत येत आहे. अक्षयचा हा ‘पृथ्वीराज’ सिनेमा कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे ‘पृथ्वीराज’ हे नाव बदलण्यासाठी दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. आज दिल्ली हायकोर्टाने या याचिकेची सुनावणी करण्यासाठी नकार दिला आहे.

याचिकाकर्त्याने म्हटले होते की, “या चित्रपटाच्या नावामध्ये महान योद्धा असलेल्या पृथ्वीराज यांचे नाव कोणत्याही आदराशिवाय वापरले गेले असल्यामुळे ते लोकांच्या भावनांना तडा देत आहे.” यामुळेच या सिनेमाचे नाव बदलनायची मागणी त्यांनी केली. मात्र कोर्टाने ही याचिका नाकारली आहे. याआधी देखील करणी सेनेने या चित्रपटाविरोधात आवाज उठवला होता. करणी सेनेने या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली होती. यासाठी करणी सेनेने चित्रपटाच्या निर्मात्यांवर हिंदू सम्राट पृथ्वीराज यांची चुकीची प्रतिमा लोकांसमोर आणल्यामुळे एक जनहित याचिका दाखल केली होती. हिंदू सम्राट पृथ्वीराज यांचा चुकीचा आणि अश्लील फोटो सादर केल्याचे सांगत यामुळे लोकांच्या भावनां तेस पोचल्याचे सांगितले होते. चित्रपटात याप्रकारे सीन तयार करून राजा पृथ्वीराज यांची प्रतिमा दाखवली गेली आहे, ती आयपीसी कलम १८६० नुसार एक अपराध आहे.

Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/yashraj

अक्षय कुमारच्या पृथ्वीराज सिनेमाची घोषणा २०१९ साली करण्यात आली होती. घोषणेच्या बऱ्याच काळानंतर हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होत आहे. या सिनेमातून अक्षय कुमारसोबत २०१७ साली मिस वर्ल्डचा मुकुट जिंकणारी मानुषी छिल्लर दिसणार आहे. या सिनेमातून मानुषी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटात अक्षय आणि मानुषीसोबतच संजय दत्त, सोनू सूददेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा