अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल हे बॉलिवूड इंडस्ट्रीच्या पॉवर कपलपैकी एक आहेत. जगाच्या नजरेपासून लपून दोघांनीही घराच्या छतावर लग्न केले. दोघेही अनेक वर्षांपासून चित्रपट जगतात सक्रिय आहेत. काजोल आणि अजय आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतात. काजोल आणि अजय देवगण यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यामुळे त्यांची फी देखील खूपच महाग आहे. दोघेही करोडो रुपये कमावतात आणि आलिशान लाइफस्टाईल जगतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
काजोल आणि अजय यांचा मुंबईत करोडो रुपयांचा आलिशान बंगला आहे. याशिवाय, या सुंदर जोडप्याकडे अशा अनेक आलिशान गोष्टी आहेत, ज्यातून तुम्हाला त्यांच्या रॉयल लाइफस्टाईलची कल्पना येऊ शकते. आज आपण काजोल आणि अजयच्या काही आलिशान गोष्टींबद्दल जाणून घेऊया. ज्यामध्ये आलिशान कार कलेक्शनपासून ते वैयक्तिक विमानापर्यंतचा समावेश आहे.
जुहूमध्ये आहे आलिशान बंगला
काजोल आणि अजय यांचा जुहूमध्ये एक आलिशान बंगला आहे. जेथे दोघे वर्षानुवर्षे राहत आहेत. या बंगल्याचे नाव आहे ‘शिवा शक्ती’ आहे. याशिवाय, जोडप्याने लॉकडाऊनमध्ये एक नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ही प्रॉपर्टी त्यांच्या घराजवळ आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, अजय आणि काजोलची नवीन मालमत्ता ६० कोटी रुपये आहे, जी ५९० स्क्वेअर यार्डमध्ये पसरलेली आहे.
प्रत्येक बॉलिवूड स्टारप्रमाणे काजोल आणि अजयनेही परदेशात प्रॉपर्टी खरेदी केली आहे. लंडनमध्ये त्यांचे आलिशान घर आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, या जोडप्याचे घर लंडन पार्क लेनमध्ये आहे आणि या घराची किंमत सुमारे ५४ कोटी रुपये आहे.

अजय हा त्या भारतीय अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांचे स्वतःचे वैयक्तिक विमान आहे. त्याने २०१० मध्ये ६ सीटचे खाजगी विमान खरेदी केले आहे. तो शूटिंग, जाहिराती आणि वैयक्तिक ट्रिपसाठी त्याचा वापर करताना दिसतो.
काजोल आणि अजय देवगण अनेक महागड्या वाहनांचे मालक आहेत. २०१९ मध्ये त्याने ‘रोल्स रॉयस कुलिनन’ कार खरेदी केली होती, माध्यमांतील वृत्तानुसार, या कारची किंमत ६.९५ कोटी रुपये आहे. याशिवाय, या जोडप्याकडे ‘ऑडी क्यू ७’ ते ‘बीएमडब्ल्यू एक्स ७ एसयूव्ही’ पर्यंत अनेक आलिशान वाहने आहेत, जी त्यांच्या लेटेस्ट टेकनिकमुळे चर्चेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी
–वामिकाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या रणवीरला नेटकऱ्यांनी विचारले, आई-बाबा कधी होणार?