Saturday, September 30, 2023

प्रिया बेर्डेंचा गौप्यस्फोट! राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर म्हणाल्या, ‘मी घुसमटणारी नाहीये पण…’

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या 90च्या दशकातील गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी आता पर्यत अनेक हिट चित्रपट दिली आहेत. प्रिया यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच प्रिया या राजकारणात देखील सक्रिय असतात. त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

प्रिया बेर्डे (Priya Beirde) यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश का केला? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिसखुलास उत्तर दिले. प्रिया बेर्डे ‘मित्र म्हणे’ या यूट्युब चॅनलेवर मुलाखती दिली आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. प्रिया बेर्डे या नुकत्याच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकल्या. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चत आल्या होत्या.

‘तुम्ही पहिला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता, त्यानंतर भाजपमध्ये गेलात? या प्रश्नाचे उत्तर देताना प्रिया बेर्डे म्हणाल्या की, ” मला भाजपामध्ये काम करण्याची संधी मिळाली अस वाटल. इतकचं नाही तर मला मोठं-मोठ्या नेते मंडळींना देखील भेटता येत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, फडणवीस साहेब, सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मी भेटते. त्यांना मी बोलते इतकच नाही ते माझ ऐकतात देखील. सांस्कृतिक विषयाबद्दल एवढं ज्ञान असलेला मी अजूनपर्यंत कोणता नेता पाहिलेला नाही. आपल्या मनोरंजनसृष्टीबद्दल त्यांना खूप ज्ञान आहे.”

तसेच त्यांना अनखी एक प्रश्न विचारळ्यात आला.‘तुमची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होतं होती?’ त्यावर प्रिया बेर्डे म्हणाल्या, “राष्ट्रवादी पक्षामध्ये मी दोन-अडीच वर्ष काम केलं आहे. त्यावेळी मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. मी फार मोठ्या पदावर नव्हते, मी खूप छोट्या पातळीवर काम केलं. पण तिथे मी मन लावून आणि खूप काम केले. मी तिथे माझी घुसमट झाली असं म्हणार नाही. कारण मी घुसमटणारी नाहीये.” (Priya Baird told the reason for leaving NCP)

अधिक वाचा- 
उर्फी जावेद बायसेक्शुअल आहे का? अभिनत्रीचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी विचारला प्रश्न
‘सॅक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्रीच्या बिकिनी फोटोंनी वाढवलं तापमान, Photos

हे देखील वाचा