अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे अडचणीत, दहा वर्षापुर्वीच्या खटल्यात भरावा लागणार दहा लाखांचा दंड

0
145
priya berde alka kubal
Photo Courtesy: Instagram/ priyalakshnikantberde /alkakubal

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. नुकताच (23, सप्टेंबर) रोजी अलका कुबल यांचा वाढदिवस झाला. यावेळी सोशल मीडियावरुन त्यांच्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. मात्र वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना मोठा धक्का बसला असून मुंबई उच्च न्यायालयाने अलका कुबल तसेच अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांना दहा लाखाचा दंड ठोठावला आहे. हे संपूर्ण प्रकरण 10 वर्षापुर्वीचे असून त्याचा न्यायालयाने निकाल दिला आहे. काय आहे हे नेमके प्रकरण, चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अलका कुबल आणि प्रिया बेर्डे या मराठी चित्रपट जगतातील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र सध्या त्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. एका 10 वर्षापुर्वीच्या खटल्यामध्ये त्यांना 10 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पुण्यात महामंडळाच्यावतीने केलेल्या मानाचा मुजरा या सांस्कृतिक कार्यक्रमात अनावश्यक खर्च केल्यामुळे त्यांचे ११ लाख रुपये सहा आठवड्यात न्यायायलयात भरावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आजी व माजी पदाधिकारी, संचालकांना दिला आहे. ज्यामध्ये अभिनेते विजय पाटकर, प्रसाद सुर्वे, प्रिया बेर्डे तसेच अलका कुबल यांच्या नावाचा समावेश आहे.

हे प्रकरण 2012-13 सालचे असून त्यावेळी पुण्यात मानाचा मुजरा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी संचालकांनी 52 लाख रुपये खर्च केले होते. ज्यावर सभासदांनी आक्षेप घेत या चुकीच्या खर्चाची चौकशी तसेच वसुली करण्याची मागणी केली होती. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी १० लाख ७८ हजार रुपये तातडीने भरण्याचा आदेश दिला. पण याला संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण त्यांची याचिका फेटाळून लावत ती रक्कम सहा आठवड्यात भरण्याचा आदेश देण्यात आला आहे.

हेही वाचा- अबब! अक्षय कुमारने ‘इतक्या’ कोटींला विकला मुंबईमधील बंगला, परदेशातील संपत्ती पाहून होतील डोळे पांढरे
‘धकधक गर्ल’ने वाढवली चाहत्यांच्या ह्रदयाची धडधड! वीस वर्षानंतर ‘डोला रे’ गाण्यावर थिरकली माधुरी, व्हिडिओ व्हायरल
काय सांगता! नोरा फतेही बंदुकीमुळे झाली होती जखमी? अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here