Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रिया बापट अन् उमेशचे लिपलॉक फोटो व्हायरल; लोक म्हणाले, ‘कामत जोडी म्हणजे…’

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं प्रिया बापट आणि उमेश कामत यांची रोमँटिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. प्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर उमेशसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारत, किस करत आणि प्रेमळ नजरेने पाहताना दिसत आहेत. प्रिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. प्रिया अनेकदा उमेशसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यांच्या फोटोवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

प्रियाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. प्रियाने (Priya Bapat and Umesh wedding anniversary) त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट करताना प्रियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “18 वर्षे प्रेमात आणि 12 वर्षांचा संसार!” तिच्या या पोस्टव कमेंट करताना एकाने लिहिले की, “कामत जोडी म्हणजे कमल आहे.” तर अनेकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकात ते दोघेही प्रमुख भूमिकेत दिसले. हे नाटक सोनल प्रोडक्शन, नंदू कदम आणि प्रिया बापट यांची निर्मिती असून अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. इरावती कर्णिक यांनी नाटकाचे लेखन केले आहे. प्रिया-उमेशसह आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय यांनीही नाटकात प्रमुख भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 प्रिया आणि उमेश या दोघांनीही मराठी मनोरंजनसृष्टीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यांनी दोघांनीही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खिळवून ठेवले आहे. मात्र, त्यांना दोघांनाही एकत्र रंगमंचावर पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. ती इच्छा आता या नाटकाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. ‘जर तर ची गोष्ट’ हे नाटक एक प्रेमकथा आहे. या नाटकात प्रिया आणि उमेश हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असलेले दोन व्यक्तींच्या भूमिका साकारत आहेत. मात्र, त्यांच्या प्रेमाला अनेक अडथळे येतात. अशा परिस्थितीत ते दोघेही एकमेकांच्या काय होणार, हे प्रेक्षकांना नाटकात पाहायला मिळत आहे. (Priya Bapat and Umesh Kamat liplock photos wedding anniversary go viral)

आधिक वाचा-
ईडीच्या रडारवर बॉलिवूड, रणबीरनंतर आता कपिल शर्मा, श्रद्धा कपूर आणि हिना खान यांना ईडीचे समन्स
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच पडद्यावर, ‘गडकरी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

हे देखील वाचा