Tuesday, September 26, 2023

पावसात आनंद लुटताना दिसले प्रिया बापट आणि उमेश कामत; चाहते म्हणाले, “तुमची जोडी…”

मराठी मनोरंजनविश्वातील खूप लोकप्रिय, ग्लॅमरस आणि प्रसिद्ध जोडीपैकी एक जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत होय. या दोघांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावरही त्यांची जोडी चांगलीच हिट ठरली आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ, रील प्रचंड व्हायरल होतात. त्यामुळे ते लाइमलाइटमध्ये येतात. प्रिया आणि उमेश सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय आहे. ते नेहमीच काही ना काही पोस्ट करत असतात.

प्रिया (Priya Bapat) आणि उमेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे पावसात भिजताना दिसत आहेत. प्रियाची बहिण श्वेता बापटच्या ‘सावेंची नावाच्या’ साडी ब्रँडच्या शूटदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. या ब्रँडच शूटींग पुण्यात करण्यात आले आहे. शुटींगनंतर दोघांनी पावसात मनोसोक्त आनंद घेतला.

या व्हिडिओमध्ये प्रियाने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. प्रिया आणि उमेशने पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची छत्री हातात घेतली आहे. तर त्याच वेळी उमेश प्रियाच्या तोंडावर पाणी उडवताना दिसत आहे. प्रिया आणि उमेशच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हा व्हिडिओ प्रियाने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना प्रियाने #प्रेम आणि #पाऊस हे हॅशटॅग वापरले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “अजूनही बरसात आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “तुमची जोडी लई भारी आहे.” त्या दोघाचे चाहचे त्यांच कौतुक करत आहेत. प्रिया आणि उमेश हे मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल आहे. ते दोघे मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये काम करताना दिसतात. सध्या प्रियाची निर्मिती असलेले आणि उमेशचा अभिनय असलेले ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक चांगलेच चर्चेत आले आहे.

अधिक वाचा- 
..आणि म्हणून निळू भाऊंनी विनम्रतेने नाकारला ‘महाराष्ट्र भूषण’
“मराठी चित्रपटसृष्टीला काही वर्षे गरज…” मधुराणी गोखलेचे ‘तो’ व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा