Wednesday, January 21, 2026
Home मराठी नाचो’, म्हणत ‘मेरा यार’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री प्रिया बापट, २०२२ मधील पहिला व्हिडिओ आला समोर

नाचो’, म्हणत ‘मेरा यार’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री प्रिया बापट, २०२२ मधील पहिला व्हिडिओ आला समोर

मराठी चित्रपटसृष्टीतील सध्या टॉपला असणारी अभिनेत्री प्रिया बापट (priya bapat). प्रिया सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दररोज तिच्या चाहत्यांसाठी ती न चुकता फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद देत असतात. प्रियाने अनेक चित्रपट तसेच नाटकांमध्ये काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

प्रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती “मेरा यार” या गाण्यावर डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये तिने शर्ट आणि जीन्स घातली आहे. तिचा डान्स नेहमीच तिच्या चाहत्यांना खूप आवडत असतो. अशातच तिच्या या डान्सने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांची मने चोरली आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने “नाचो” असे कॅप्शन दिले आहे. (Priya bapat share her dance video on social media)

तिचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच अभिनेता आशुतोष गोखले याने कमेंट केली आहे की, “म्हणून प्रयोग चालू असताना, स्टेजवर आवाज येत होता गाण्याचा.” बाकी तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच अनेकजण तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील देत आहेत.

प्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच नुकतेच काही दिवसांपूर्वी तिच्या सिटी ऑफ ड्रीम या वेब सीरिज च दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. या वेबसीरिजमधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक झाले आहे.

हेही वाचा :

…म्हणून योगिता तिचे लाल रंगाचे कपडे कधीही घालते, सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

नवीन वर्षाच्या रात्री नेहा कक्कर अन् रोहनप्रीतमध्ये घडले ‘असे’ काही, की स्टेजवरच गायिकेला कोसळले रडू

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विशाल-विकास जोडीने घेतले जोतिबाचे दर्शन, पाहा व्हिडिओ

 

हे देखील वाचा