अभिनेत्री प्रिया बापटने सिनेसृष्टीत अगदी कमी कालावधीत स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. आज तिचे लाखो चाहते आहेत. छोट्या भूमिका करण्यापासून ते मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारण्यापर्यंत, प्रियाने खूप मेहनत घेतली आहे. आजपर्यंत तिने तिच्या अभिनयाचा आलेख कायम उंचच ठेवला आहे. त्यामुळेच आज तिला प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे. ही सुंदर अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करत असते.
अलीकडेच प्रियाने तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती आता चर्चेत आली आहे. प्रिया या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यातील तिच्या अदा पाहून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. यामुळेच फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय.
हे ग्लॅमरस फोटो शेअर करत, प्रियाने कॅप्शनमध्ये ‘सारी नॉट सॉरी’ असं लिहिलंय. प्रिया अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा तिचे फोटो व्हायरलही होत असतात. ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही लूकमध्ये प्रिया अतिशय सुंदर दिसते. याशिवाय कामत दाम्पत्य त्यांच्या रोमँटिक फोटोंसाठीही चर्चेत असतात. प्रियाचे तिचा पती अभिनेता उमेश कामतसोबतचे रोमँटिक फोटो दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अभिनेत्री प्रिया बापटने नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे, आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…