Tuesday, July 9, 2024

कोकणात गावी जाऊन बालपणीच्या रम्य आठवणींमध्ये रमली प्रिया बापट, सुंदर व्हिडिओ केला शेअर

कलाकार हे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे स्वतःसाठी खूप कमी वेळ देतात. बालपणीच्या आठवणीत पुन्हा जगण्यासाठी त्यांना पुरेसा वेळच नसतो. अशावेळी जर तुम्हाला पुन्हा तुमचे बालपण जगण्याची संधी मिळाली तर कोण सोडेल. अशीच एक संधी चालून आली अभिनेत्री प्रिया बापटच्या नशिबात. मराठी आणि हिंदी विश्वात दिसणारी अभिनेत्री प्रिया बापट तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे प्रिया सतत चर्चेत असते. नुकतीच प्रियाने तिच्या मूळ गावी जाऊन तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. याचा एक मस्त व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मूळची कोकणातली असलेल्या प्रियाचे कोकणासोबत एक वेगळेच नाते आहे. तब्बल वीस वर्षांनी प्रिया कोकणात गेली आणि तिच्या बालपणीच्या रम्य आठवणींमध्ये पोहचली. प्रियाने एक छानसा व्हिडिओ पोस्ट करत तिच्या या ट्रिपबद्दल सर्वांना माहिती दिली. प्रियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सुंदर गुलाबी आणि पांढरा ड्रेस घातलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया गाडीने कोकणात पोहचली. तिथे गेल्यावर तिने ती लहान असताना जी मस्ती करायची ती सर्व केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्रिया गावातल्या कच्च्या रस्त्यांवर मस्त बागडत आहे. याशिवाय तिथे असणाऱ्या टुमदार बसक्या कौलारू घरांसमोर बसून बालपण आठवणारी प्रिया, वडाच्या झाडांच्या पारंब्यांना लटकणारी, झाडावर सरसर चढून फळं तोडणारी प्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. प्रियाने तिचा हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “माझे आई -बाबा मूळचे कोकणातले. आई राजापुरची आणि बाबा देवगडचे. त्यामुळे लहानपणी आमच्या प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही कोकणात असायचो. चुलीवरचा मेतकुट भाताची न्याहारी, झाडावर चढून जांभळं, कैऱ्या चोरणे, दुपारी पत्ते खेळणे, संध्याकाळी गुळ-दाणे सोबत घेऊन पेडावर जाणे, रात्री अंगणात झोपून चांदण्या पाहणे. २० वर्षांनी राजापूरला गेले. जिथे आईचा जन्म झाला, ती मोठी झाली. माझं बालपणं पुन्हा जगले.”

प्रियाने आतापर्यंत मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये आपली चमक दाखवली आहे. मराठीसोबतच प्रियाने हिंदीमध्ये देखील उत्तम काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिलजीत दोसांझ आहे दहावी पास, कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आला होता चर्चेत
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद काही थांबेना, आता थेट महिला आयाेगाकडून चित्रा वाघ यांना नाेटीस

हे देखील वाचा