Monday, June 9, 2025
Home मराठी ‘आता तुला हाडाचा कलाकार…’ प्रिया मराठेने नवऱ्याच्या जिद्दीला सलाम करत लिहिली खास पोस्ट

‘आता तुला हाडाचा कलाकार…’ प्रिया मराठेने नवऱ्याच्या जिद्दीला सलाम करत लिहिली खास पोस्ट

कलाकार म्हटले की, त्यांना त्यांच्या वेळा आणि तारखा या पाळाव्याच लागतात. काहीही झाले तरी कलाकरांना थांबण्याचा पर्याय नसतो. ‘द शो मस्ट गो ऑन’ म्हणत त्यांना पुढे जावेच लागते. मात्र याचा कलाकारांना कधीच पश्चाताप नसतो. ते आनंदाने आलेल्या परिस्थीला सामोरे जातात आणि मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे हाती घेतेले काम पूर्ण करत असतात. असाच एक किस्सा घडला आहे अभिनेता शांतनू मोघे सोबत. अतिशय प्रतिभावान आणि भारदस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या शांतूनला देखील असेच काहीसे म्हणायची वेळ आली आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय आणि प्रसिद्ध मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या शांतनू मोघेंची अमाप मोठी फॅन फॉलोविंग आहे. या मालिकेने त्याला खूप काही मिळवून दिले. टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करत असतानाच शांतनू रंगभूमीवर देखील सक्रिय आहे. त्याचे ‘सफरचंद’ हे नाटक दणक्यात सुरु असून, ते खूप गाजत आहे. या नाटकाच्या शोच्या आधी असे काही घडले की, शांतनू स्टेजवर जाईल की नाही याबाबतच सर्वांना साशंकता होती, मात्र शांतनुने देखील हार न मानता शो पूर्ण केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

यासाठीच शांतनूची पत्नी आणि अभिनेत्री असणाऱ्या प्रिया मराठेने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सगळ्यांनाच एक माहिती देखील दिली आणि नवऱ्याचे कौतुक देखील केले. प्रियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “रिअल हिरो!
Hatts off वगैरे अलंकार फार छोटे वाटत आहेत.
हे तूच करू जाणे..
तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम!
ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते.. पाय फ्रॅक्चर झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनू नी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे..
कमाल! आता तुला हाडाचा कलाकार म्हणता येईल”.

प्रिया मराठेची ही पोस्ट कमालीची व्हायरल होत असून नेटकऱ्यांसोबतच कलाकारांनी देखील शंतनूच्या या कामाचे कौतुक केले आहे. पायाला दुखापत होऊनही केवळ दिलेल्या शब्दामुळे आणि होणारे नुकसान टाळता येणे शक्य नसल्यामुळे त्याने हा शो केला.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

हे देखील वाचा