आयुष्यात प्रेमात पडणे खूप सोप्पे असते, परंतु तेच प्रेम शेवटपर्यंत निभावणे खूप अवघड गोष्ट असते. सुरुवातीला मजेत असणारे रिलेशन, नंतर जाऊन कपलमध्ये भांडणं होतात आणि ब्रेकअप करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय राहत नाही. परंतु हा निर्णय त्यांच्या आयुष्यात खूप दुःख देतो. आपल्या जोडीदाराची सवय झाल्यावर त्याच्याशिवाय आयुष्यातील प्रत्येक क्षण घालवणे त्या कपलला खूप अवघड जाते. अनेकवेळा लोकं डिप्रेशनमध्ये जातात. असे काहीसे इंटरनॅशनल अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबतही घडले आहे.
प्रियांका चोप्राने तिचे पुस्तक ‘अनफिनिश्ड’मध्ये तिच्या लव्ह लाईफबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तिने लिहिले आहे की, “मी एका चांगल्या पुरुषासोबत रिलेशनमध्ये होते आणि आम्ही खूप चांगला वेळ देखील घालवला आहे. परंतु आमचे रिलेशन संपल्यानंतर मी स्वतःला गमावून बसले होते. मला समजले नाही की, मी या दुःखात कशी पोहचले” (Priyanka Chopra after the breakup know the condition of every girl did)
ब्रेकअपनंतर प्रियांकाला असे वाटत होते, जसे काय असा अनुभव आलेली किंवा फिलिंग येणारी ती एकटीच आहे. परंतु अनेकजण ब्रेकअप झाल्यावर हेच फिल करतात. अनेकजण या परिस्थितीत स्वतःला सांभाळणे अवघड होते. ज्यांना त्यांच्या रिलेशननंतर असे अनुभव आले आहेत, त्यांना काहीतरी कारण आहे.
आपल्या वैयक्तिक आयुष्यात काहीही प्रॉब्लेम आला तरी त्याचा थेट परिणाम आपल्या व्यावसायिक आयुष्यावर होतो. परंतु प्रियांकाने ब्रेकअपचा जास्त परिणाम त्याच्या व्यावसायिक आयुष्यावर पडू दिला नव्हता. परंतु बऱ्याच लोकांना आयुष्यात या गोष्टी सांभाळता येत नाहीत. ब्रेकअपमुळे ते करिअरमध्ये मागे राहतात.
ब्रेकअपनंतर स्वतःला सांभाळणे ही अवघड गोष्ट आहे. त्या व्यक्तीला असे वाटते की, त्याचे शरीर सुन्न पडले आहे आणि त्याच्या आयुष्यात आता काहीच उरले नाही. त्याच्या आयुष्यातून त्याची खास व्यक्ती निघून गेल्यावर तो पूर्णपणे एकटा पडतो. याचा परिणाम त्याच्या व्यावसायिक आयुष्यावर देखील होतो.
ब्रेकअप झाल्यानंतर अनेकवेळा लोक तलावातून बाहेर पडलेल्या माशाप्रमाणे होतात. यावेळी ते अनेकवेळा चुकीच्या संगतीत जातात आणि वाईट सवयींच्या आहारी जातात. यात ते सिगारेट यांच्या सारख्या पदार्थांचे सेवन करण्यास चालू करतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या
-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद
-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी










