Friday, July 12, 2024

गुड न्यूज! अभिनेत्री प्रियंका चोप्रा बनली आई! पण कुणालाच खबर नाही? अखेर प्रियंकानेच केला खुलासा, वाचा

बॉलिवूड आणि आता हॉलिवूडचीही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra). आता प्रियंकाबाबत एक आनंदाची आणि तिच्या चाहत्यांसाठी तितकीच सुखद अन् धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही आई बनली आहे.

प्रियंका चोप्राने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट लिहून ही गुड न्यूज दिली आहे. प्रियंकाने सोशलवर लिहिलेल्या पोस्टनुसार प्रियंका आणि आणि निक ((Nick Jonas) हे दोघेही माता-पिता बनलेत. महत्वाचं म्हणजे प्रियंकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ‘सरोगसी’ माध्यमातून पालक बनण्याचे ठरवले होते आणि आता त्यांचे बाळ त्यांच्याजवळ आहे. (Nick Jonas and Priyanka Chopra welcome baby via surrogate)

काय म्हटलंय प्रियंकाने…

प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. त्यात तीने म्हटले आहे की, “आम्ही खुप आनंदी आहोत. आम्ही सरोगसीद्वारे आमच्या बाळाचे स्वागत केले आहे. या बातमीची पुष्टी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. परंतू, आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे या काळात आम्ही गोपनीयता ठेवण्याचा विचार करत आहोत.” (Priyanka Chopra and Nick Jonas welcome their first baby)

प्रियंकाने हा सुखद धक्का दिल्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावर आनंदाची एकच लाट आली. तसेच प्रियंका आणि निक जोनास यांच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा –

हे देखील वाचा