Tuesday, April 15, 2025
Home बॉलीवूड क्युटनेस ओव्हरलोडेड! अखेर प्रियांका चोप्राने दाखवला मुलगी मालतीचा चेहरा

क्युटनेस ओव्हरलोडेड! अखेर प्रियांका चोप्राने दाखवला मुलगी मालतीचा चेहरा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी प्रियांका नेहमीच या ना त्या कारणामुळे लाइमलाईटमध्ये येत असते. प्रियांकाने जेव्हा तिच्या मुलीच्या जन्माची घोषणा केली. तिने तिच्या मुलीच्या मालती मेरीच्या जन्मानंतर ती सतत मुलीमुळे चर्चेत राहिली. फॅन्स आणि नेटकरी तिच्या मुलीचा, चेहरा पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र प्रियांकाने तिचा चेहरा कधीच जगासमोर आणला नाही. मात्र ता मालतीचा चेहरा समोर आला आहे.

मालतीच्या जन्मानंतर प्रियांकाने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते, मात्र तिचा चेहरा कधीच दिसू दिला नाही. आता मात्र तिने तिचा चेहरा जगासमोर आणला आहे. दरम्यान प्रियांकाने ३० जानेवारी रोजी पहिल्यांदाच मुलगी मालतीसोबत सार्वजनिक ठिकाणी आली. निक जोनास आणि त्याच्या भावांना हॉलीवुड वॉक ऑफ फेम स्टार अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला प्रियांकाने तिच्या मुलीसह मालतीसह हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने जोनास ब्रदर्सच्या आनंदात सहभागी होत सोहळ्याला चार चांद लावले. या सोहळ्याचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, प्रियांकाने देखील या कार्यक्रमाचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

या फोटोंमध्ये पाहिले तर मालतीने पांढऱ्या रंगाचा टॉपसोबतच क्रीम रंगाचे स्वेटर आणि मॅचिंग शॉर्ट्स घातले होते. या ड्रेसमध्ये ती अतिशय क्युट दिसत होती तिचा क्युटनेस अधिक वाढवला तो तिच्या पांढऱ्या रंगाच्या हेयर बँडने. मालती तिच्या आईच्या मांडीमध्ये बसून मस्ती करताना दिसली. प्रियांकाने तिच्या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निक त्याच्या स्पीचमध्ये मालतीचे नाव घेताना दिसला. त्याने नाव घेतल्यानंतर प्रियांकाने मालतीला मांडीवर उभे करत निककडे इशारा करताना दिसली. प्रियांकाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, तिच्या या व्हिडिओमुळे मालतीचा चेहरा दिसला आणि फॅन्समध्ये आनंदाची लाट उसळली आहे. अनेकांनी कमेंट्स करत मालतीला क्युट म्हटले आहे, तर काहींनी मालतीला निक सारखी दिसते असे म्हटले आहे.

तत्पूर्वी प्रियांका आणि निक जोनासने २०१८ साली राजस्थानमध्ये लग्न केले. २०२२ साली सुरुवातीलाच सरोगसीचा माध्यमातून मालतीचा जन्म झाला. काही दिवसांपूर्वीच मालती एक वर्षाची पूर्ण झाली. तब्बल एक वर्षाने प्रियांकाने तिचा चेहरा जगासमोर आणला आहे. मेडिकल समस्यांमुळे प्रियांका आणि निकने सरोगसीचा माध्यमातून मुलीला जन्म दिला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पडद्यावरची पार्टनर ते आयुष्यभराची अर्धांगिनी, ‘अशी’ होती रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

सुकेशच्या आधी चाहत खन्नाचे नाव जाेडले गेले ‘या’ प्रसिद्ध गायकासोबत; 2 घटस्फाेटानंतर कुठे आहे अभिनेत्री?

 

हे देखील वाचा