बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास तिच्या लूक आणि स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत येत असते. पाश्चिमात्य ते पारंपारिकपर्यंत प्रत्येक आऊटफिटमध्ये प्रियांका सुंदर दिसते. यामुळेच तिचे चाहते कोटींमध्ये आहेत. अलीकडेच प्रियांकाने एका प्रसिद्ध ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
खरंतर नुकतेच प्रियांकाने वॉग मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. ती सप्टेंबर महिन्याची ‘कव्हर गर्ल’ बनली आहे. फोटोशूट दरम्यान प्रियांका लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. यात तिचा लूक खूपच आकर्षक दिसत होता. लक्झरी फॅशन ब्रँड ख्रिश्चन डायरकडून अभिनेत्रीने हा सुंदर ड्रेस पिक केला होता. (priyanka chopra is wearing a mangalsutra in her latest photoshoot check out the photos here)
या आऊटफिटला व्ही नेकलाइन देण्यात आली आहे. तसेच हा ड्रेस वेस्टलाईनवर पूर्णपणे फिट ठेवण्यात आला आहे. हा स्टायलिश लूक पूर्ण करण्यासाठी प्रियांकाने तिच्या गळ्यात मंगळसूत्र, चेहऱ्यावर सॉफ्ट शिमर असलेली ब्राऊन शेड लिपस्टिक वापरली. अभिनेत्रीने तिचे केस ओले ठेवून, हाफ टायमध्ये मोकळे सोडले आहेत.
दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांकाने लॉंग स्लीव्ज दुमडले आहेत. यात तिने लाल टॉपसोबत नारंगी रंगाचा स्कर्ट मॅच केलेला पाहायला मिळाला. यासोबत तिने गळ्यात निळा- चांदीचा हार आणि हाताचे ब्रेसलेट घातले होते. प्रियांकाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
लवकरच या चित्रपटांत झळकणार अभिनेत्री
प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर काळापूर्वीच तिच्या ‘जी ले जरा’ या आगामी बॉलिवूड चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा एक रोड ट्रिपवर आधारित चित्रपट असेल, ज्यात कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील महत्त्वाच्या भुमिका साकारताना दिसतील.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट
-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’
-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण










