Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवरचं केले किस, व्हिडिओ तुफान व्हायरल

प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवरचं केले किस, व्हिडिओ तुफान व्हायरल

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार बनली आहे. अभिनयासोबतच प्रियांका तिच्या सामाजिक कार्यामुळेही चर्चेत असते. अलीकडेच प्रियांका युक्रेनमधील निर्वासितांना भेटण्यासाठी पोलंडला पोहोचली होती. दरम्यान, प्रियांका चोप्रा ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल होस्ट करताना दिसली. जिथे तिचा पती निक जोनास ‘जोनास ब्रदर्स’सोबत परफॉर्म करताना दिसला होता. मात्र, संपूर्ण कार्यक्रमात जोनास आणि प्रियांकाच्या लव्ह केमिस्ट्रीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये शनिवारी ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. प्रियांका चोप्रा जोनास या महोत्सवाचे सूत्रसंचालन करताना दिसली. शो दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निक जोनास आणि निक जोनास सर्वांसमोर एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये जोनास ब्रदर्स ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलच्या मंचावर सादरीकरण केल्यानंतर परिचय देताना दिसत आहेत. त्याच वेळी, परिचयाच्या शेवटच्या भागात, निक जोनासने पत्नी प्रियांकाला स्टेजवर एक सुंदर परिचय देऊन बोलावले. त्याचवेळी प्रियांका चोप्रा सर्वांसमोर निकला स्टेजवर किस करायला लागते. मात्र, यानंतर प्रियांकाने जोनास ब्रदर्सलाही मिठी मारली. व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा रंगीबेरंगी ड्रेसमध्ये मोठ्या उत्साहात ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचे आयोजन करताना दिसत आहे. त्याचवेळी, प्रियांका चोप्राची कूल स्टाइल व्हिडिओमध्ये  दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi ???? (@jerryxmimi)

दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला असून नेटकऱ्यांच्या त्यावर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा – ‘हा चित्रपट भारतीय नाही…’,छेल्लो शोला ऑस्करसाठी पाठवण्यावरून वाद पेटला
‘जंगलात राघू खूप असतात पण वाघ एकच…’, अमेय वाघची सुमित राघवनला टॅग करत खळबळजनक पोस्ट
बापरे! ‘तो लग्न करण्यासाठी पैशाची थैली घेवून आला होता…’, रिंकूच्या प्रेमात सैराट झालेल्या चाहत्याचा किस्सा

हे देखील वाचा