Thursday, April 25, 2024

‘जंगलात राघू खूप असतात पण वाघ एकच…’, अमेय वाघची सुमित राघवनला टॅग करत खळबळजनक पोस्ट

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या अभिनयाइतकेच सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. यामध्ये अभिनेता अमेय वाघचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अमेय वाघ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. ज्यावरुन तो अनेक विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसत असतो. मात्र नुकतेच अमेय वाघने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन थेट अभिनेता सुमित राघवनला टॅग करत खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चाहते चांगलेच गोंधळात सापडले आहेत. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता अमेय वाघने (Amey Wagh) नुकतीच आपल्या अधिकृत फेसबूक अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जंगलात राघू Sumeet Raghvan खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो. याची कृपया नोंद घ्यावी असा कॅप्शन देत थेट सुमित राघवनला टॅगही केले आहे. अमेयच्या या पोस्टचे नेमके कारण समजू शकल्याने चाहतेही चांगलेच गोंधळात पडले आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी त्याला काय भानगड आहे असाही प्रश्न केला आहे.

दरम्यान अभिनेता अमेय वाघ मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमधून तर अमेय घराघरात लोकप्रिय झाला होता. त्यानंतर अमेयनं फास्टर फेणे, मुरांबा, कारखानीसांची वारी यांसारख्या सिनेमातून त्यानं काम केलं. मराठी सिनेमांबरोबरच अमेयनं वेब सीरिज आणि हिंदी सिनेमांतही काम केलं आहे. अमेय जसा उत्तम अभिनेता तर आहेच त्याचबरोबरीनं त्याची विनोदबुद्धी देखील उत्तम आहे. सोशल मीडियावर अमेयच्या विनोदबुद्धीचं दर्शन त्याच्या चाहत्यांना नेहमीच होत असतं.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- अभिनेत्री ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई? व्हायरल व्हिडिओने रंगल्या चर्चा
अभिनेत्री दिव्या दत्ताला ‘अशा’ दिग्दर्शकांसोबत काम करणे नाही पसंत; म्हणाली, ‘मी नर्व्हस होते…’
श्रेयस तळपदेच्या “बेबीफेस”ची सोशल मीडियावर चर्चा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

हे देखील वाचा