Saturday, June 29, 2024

प्रियांका चोप्राने पुण्यातील बंगला दिला भाड्याने, महिन्याला मिळणार इतके लाखो रुपये!

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचे चित्रपट, तिच्या लूक आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने तिच्या चित्रपट कारकिर्दीत एक मोठा टप्पा गाठला आहे. प्रियांका चोप्रा आता अमेरिकेची रहिवासी असली, तरी तिच्या कुटुंबाचीही भारतात मालमत्ता आहे. मुंबईतील एक आलिशान घर आणि गोव्यात हॉलिडे होम याशिवाय प्रियांका चोप्राच्या कुटुंबाचा पुण्यात एक बंगला असल्याची माहिती आहे.

पुण्याचा बंगला आता प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ चोप्रा यांनी भाड्याने दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चोप्रा कुटुंबाची पुण्यातील मालमत्ता ‘द अर्बन नोमॅड्स कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड’ला भाड्याने देण्यात आली आहे. या मालमत्तेचे मासिक भाडे सुमारे 2.06 लाख रुपये आहे. बंगल्याचा भूखंड अंदाजे 3754 चौरस फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. यात बाग, तळघर आणि पार्किंगची जागा देखील आहे. ही मालमत्ता पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असल्याचे सांगितले जाते. हे पुण्यातील सर्वात पॉश क्षेत्रांपैकी एक आहे.

प्रियांका चोप्राने नुकतीच भारतात येऊन कुटुंबासोबत होळी साजरी केली. मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास आणि पती निक जोनास देखील तिच्यासोबत भारतात आले होते. अभिनेत्रीने मन्नारा चोप्रा, मधु चोप्रा आणि इतर अनेकांसोबत हा सण साजरा केला. प्रियांका चोप्राने तिची बहीण मन्नारा चोप्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही हजेरी लावली होती.

अभिनेत्रीच्या आगामी कामांबद्दल बोलायचे झाले तर, तिच्याकडे खूप काम आहे. सध्या ती ‘हेड ऑफ स्टेट’चे शूटिंग करत आहे. यामध्ये ती ॲड्रिस एल्बा, जॉन सीना आणि इतर अनेकांसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘टायगर’ या माहितीपटालाही आवाज दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘महिलांना त्यांच्या वयापेक्षा जास्त वयाच्या भूमिका मिळतात’, लारा दत्ताने केले मोठे वक्तव्य
विजय देवरकोंडाने सेक्युरिटी गार्डच्या लग्नात लावली हजेरी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हे देखील वाचा