Monday, July 1, 2024

‘सनी दोओलला पाहून थरथर कापायचे हातपाय ‘; म्हणत, प्रियंकाने चोपडाने भारत दौऱ्यामध्ये शेअर केला रंजक किस्सा

तब्बल तीन वर्षानंतर प्रियंका चोपडा भारत दौऱ्यावर परतली होती. तिने आपल्या मायदेशाच्या आठवणींना उजाळा देत भावूक होऊन अनेक गोष्टी शेअर केल्या. तिने उत्तर प्रदेश, दिल्ली आणि लखनऊला भेट दिली त्यासोबतच अनेक गोष्टीचा आढावा घेतला. तिने मुंबई बद्दलच्या अनेक जुने किस्से सांगितले. त्यापैकीच प्रियंकाने अभिनेता सनी देओल सोबतचा एक जुना किस्सा सांगितला की,ती सनीला पाहून खूप घाबरायची.

विश्वसुंदरीचा खिताब जिंकल्यानंतर प्रियंकाने चोपडा ( Priyanka Chopra) हिने साल 2002 मध्ये तमिळ चित्रपटामधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने सनी देओल (Sunny Deol) सोबत द दिरो चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा ती अभिनेत्याच्या नावानेच थरथर कापायची शुटिंगदरम्यानचा तिने एक रंजक किस्सा शेअर करत सांगितले की, “जेव्हा मी माझा पहिला चित्रपट केला हता तेव्हा मी 17 किंवा 18 वर्षाची होते आणि मी सनी देओलसोबत पहिल्यांदा द हिरो चित्रपटाच्या सेटवर भेटले तर माझे हातपाय थरथर कापत होते. मी लहानपणापासून सनी देओलला चित्रपटांमध्ये पाहीले होते. मी बरेलीसारख्या छोट्या शहरातून होते. मी सनी देओलचे अनेक चित्रपट पाहिले होते पण कधी वाटलं न्हवतं की मला त्यांच्यासबत काम करायची संधी मिळेल.”

 

 

View this post on Instagram

 

बॉलिवूडमध्ये देसी गर्ल नावाने ओळखली जाणारी प्रियंका हॉलिवूडमध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर राज्या करत आहे. तिने 2015 साली ‘क्वांटिको’मधून हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला होता. याबद्दल तिने सांगितले की, “अमेरिकासारख्या चित्रपट उद्योगात स्वत:साठी जागा बनवने माझ्यासाठी सोपे न्हवते. मला तिथे नवीन अभिनेत्रीसारखे लोकांशी भेटावे लागले. मी लहान भूमिकांपासून सुरुवात केली. मोठ्या भूमिका करण्यासाठी लहान भूमिका करणे आवश्यक असते आणि मी याच्यासोबत ठीक आहे. सगळ्यांना वाटत असेल की, हे खूप सोपं असतं पण असं नसतं. मी दररोज अजून चांगलं बनण्याचा प्रयत्न केला. अपल्या सहकलाकारांनी सांगितलेल्य प्रत्येक गोष्टी मी ध्यान देऊन ऐकल्या, त्यांच्याकडून शिकल्या. माझं अभिनय माझे काम होते आणि आता मी हेच करत असून पूर्वीपेक्षा अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे.”

प्रियंका चोपडाचा मुख्य भूमिकेतील पहिला हॉलिवूड चित्रपट लव अगेन पुढच्या वर्षी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रागाच्या भारात अर्चनाने पकडला शिव ठाकरेचा गळा, बिग बॉसने घडवली चांगलीच अद्दल
श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

हे देखील वाचा