Tuesday, March 5, 2024

रागाच्या भारात अर्चनाने पकडला शिव ठाकरेचा गळा, बिग बॉसने घडवली चांगलीच अद्दल

टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिया कार्यक्रम बिग बॉसच्या नव्या पर्वामध्ये खूप धमाकेदार गोष्टी पाहायला मिळत आहेत. गुरुवार (दि.10 नोव्हेंबर) दिवशी प्रसारित झालेल्या भागामध्ये तर बांडणाने हद्दच पार केली. वादग्रस्त कार्यक्रमामध्ये वाद एवढा पेटला की, अर्चना गौतम हिने थेट शिव ठाकरे याचा गळाच पकडला. मात्र, हे बिगबॉसला मान्य नाही त्यामुळे अर्चनाला तिच्या कर्माची फळं तर भोगावीच लागली.

सुप्रिसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस 16‘ च्या नव्या प्रवामध्ये अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळत आहेत. गुरुवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये खूपच धमाला पाहायला मिळाली अर्चना गौतम (Archana Gautam) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare) यांच्या भांडनाने तर आख्या घरालाच डोक्यावर घेतले. शेरनी म्हणत अर्चनाने चंडीचेच रुप धारण केले होते. यांच्या भांडणामध्ये अनेक जानांनी शिवलाच सपोर्ट केला. रागाच्या भारात अर्चनाने जे काही केले त्यामुळे बिग बॉसने देखिल अर्चनाला दोषी ठरवले .

झाले असे की, टीना आणि अर्चनामध्ये टिशुपेपरमुळे एकमेकींना भांडत होत्या, ज्यामध्येच शिव ठाकरेने भांडणामध्येच ऊडी मारली, त्यामुळे अर्चनाचा राग अनावर झाला. तरीही अर्चना सतत शिवला आमच्या बांडणापासून लांब राहा, तरिही शिवने ऐकलं नाही आणि मधे मधे बोलत भांडण स्वत:वर ओढून घेतले असून तिच्या वैयक्तीक आयुष्यातील काही गोष्टींवर प्रश्न केला, जे अर्चनाला सहन झाले नाही आणि तिने रागाच्या भारात शिवचा गळाच पकडला. अर्चनाच्या अशा वागणूकीमुळे टीना, निम्रित, शालिन आणि अन्य सदस्यांनी अर्चनावर संताप व्यक्त केला. त्यामुळे तिची अशी वागणूक पाहून बिग बॉसने लगेच कडक निर्णय घेत अर्चनाला घराच्या बाहेर काढले.

photo courtesy: youtube/Colors

भांडण झाल्यानंतर शालिन भनोट (Shalin Bhanot) आणि निम्रित कौर (Nimrit Kaur) यांनी शिवच्या गळ्यावर अर्चनाचे नखांचे डाग दाखवले असून कडक कारवाई करा अशी मागणी केली. यानंतर बिग बॉसने शिव आणि अर्चनाला कन्फेशन रुममध्ये बोलवले आणि बिग बॉसने अर्चनाला सांगितले की, ती शिवसोबत शेवटी काय बोलायचे असेल ते बोलू शकते. त्यावेळेसही अर्चनाने स्वत:चा पक्ष मांडत होती. यानंतर शिव आणि बिग बॉसने तिला लगेच घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तरीही अर्चना शिव आणि बिग बॉस समोर सतत विनवनी करत होती पण दोघांपैकी एकाने देखिल तिचे म्हणने ऐकले नाही आणि शोवटी अर्चनाला घारच्या बाहेर काढले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये
‘उर्फीला या स्कर्टमध्ये मच्छरही चावणान नाही’, म्हणत नेटकऱ्यांनी नवीन ड्रेसची उडवली खिल्ली…व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

हे देखील वाचा