Sunday, March 22, 2026
Home बॉलीवूड ‘पॅरिसमधील एक संध्याकाळ’, म्हणत प्रियांका चोप्राने केले आयफेल टॉवरसमोरील फोटो शेअर

‘पॅरिसमधील एक संध्याकाळ’, म्हणत प्रियांका चोप्राने केले आयफेल टॉवरसमोरील फोटो शेअर

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. निक जोनाससोबत लग्न करून प्रियांका परदेशात जाऊन सेटल झाली. मात्र तरीही तिला बॉलिवूडचा अजिबात विसर पडला नाही. बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्ये देखील तिने तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. प्रियांका शूटिंगच्या निमित्ताने संपूर्ण जगात फिरत आहे. मात्र सध्या ती एकटीच पॅरिसमध्ये जाणून पोहचली आहे.

सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी प्रियांका नेहमीच तिचे स्टेटस अपडेट करत असते. फोटो, व्हिडिओ शेअर करून ती सतत फॅन्सच्या मागण्या पूर्ण असते. सध्या ती पॅरिसमध्ये असून, तिने या ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. २५ सप्टेंबरला प्रियांकाने पॅरिसमध्ये ‘सिटीजन लाईव्ह इवेंट’ होस्ट केला. त्यावेळेसही प्रियांकाने तिच्या अंदाजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

प्रियांकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये प्रियांकाच्या लूकने आणि खासकरून तिच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. प्रियांकाने यावेळी ‘अर्थ’ म्हणजेच ‘पृथ्वी’ थीमचा ड्रेस घातला असून, या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने सुरेख असा निळ्या रंगाचा फ्रॉक घातला असून त्यासोबत मॅचिंग हिल्सही घातले आहे. प्रियांकाने शेअर केलेले फोटो आयफेल टॉवर समोर काढले आहेत. या टॉवर समोर उभी राहून प्रियांका एकापेक्षा एक अनोख्या पोज देताना दिसत आहे. ती या फोटोंमध्ये प्रचंड ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत आहे. “पॅरिसमधील एक संध्याकाळ”, असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहे.

प्रियांकाला या फोटोंमध्ये तिच्या नवऱ्याची निक जोनासची खूपच आठवण येत आहे. प्रियांकाने शेअर केलेले हे फोटो पाहून निक जोनासला देखील त्यावर कमेंट केल्याशिवाय राहता आले नाही. त्याने प्रियांकाचे कौतुक करताना लिहिले, “वाह.” यासोबतच प्रियांकाच्या लाखो फॅन्सने देखील यावर कमेंट्स करत तिची स्तुती केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने तिचे काही समरचे फोटो पोस्ट करून समरला अलविदा म्हटले होते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा